Home महाराष्ट्र दापोरी येथे श्री संत लालदास बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवास् सुरुवात ! ह.भ.प.श्री....

दापोरी येथे श्री संत लालदास बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवास् सुरुवात ! ह.भ.प.श्री. कनेरकर महाराजांच्या मधुर वाणीतून भागवत कथा प्रवचन ! श्री संत लालदासबाबांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव !

32

 

( दापोरी प्रतिनिधी ) :- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील श्री संत लालदासबाबा यांनी दापोरी गावाला आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले आहे. त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या समकालीन कालखंडात दापोरी येथे प्रगट झालेले श्री संत लालदास बाबा यांचा १०४ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात दापोरी येथे संपन्न होत आहे.
पंचक्रोशीतील अनंत भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्याकरिता दापोरीयेथे महाराष्ट्र, मध्यप्रदेश यासह विवीध ठिकाणाहून दरवर्षी लाखो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून ५ एप्रिल रोजी श्री संत लालदासबाबा यांच्या समाधीचा अभिषेक करून तिर्थस्थापणेने या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. फाल्गुन कृष्ण द्वादशी पासून सुरु होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात काकडा आरती, भागवत प्रवचन, हरिपाठ, अखंड विना वादन, कीर्तन, महाआरती, भजन, कीर्तन, भारुड यासह विविध कार्यक्रम व नवनवीन स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात. श्री संत लालदासबाबा यांच्या बद्दल श्रद्धेची भावना जनतेच्या मनामधे असून या पावन भूमीत पुण्यतिथी महोत्सवाला येणाऱ्या भक्तांची प्रचंड वर्दळ असते .
श्री संत लालदास बाबा यांचा १०४ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी येथे सालाबादा प्रमाने यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होत असून या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह विदर्भ रत्न प पु गुरुवर्य वाणी भूषण भागवतचार्य ह भ प श्री कनेरकर महाराज यांच्या अमृत तुल्य वानीतून सुरु झाला आहे.
या पुण्यतिथी माहोत्सवा निमित्य दापोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दापोरी गावासह पंचक्रोशीत आनंदाचे व उत्साहचे वातावरण असून शुक्रवार दिनांक ५ एप्रिल ते १२ एप्रिल पर्यंत चालणाऱ्या महोत्सवामध्ये विवीध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबऊन १२ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून श्री संत लालदासबाबा यांच्या पालखिचि भव्य शोभा यात्रा दापोरी गावातून निघणार असून श्री संत लालदास बाबा यांच्या पुण्यतिथि महोत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर उसळणार उसळणार आहे. श्री संत लालदास बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवात भक्तांनी मोठ्या संखेणे उपस्थित राहून दर्शन व महाप्रसाद घेण्याचे आवाहन श्री संत लालदास बाबा संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक कार्यकारिणी मंडळ, व दापोरी येथील समस्त गावकारी मंडळींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here