Home चंद्रपूर ‘त्या’दिव्यांगानी तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन प्रहार दिव्यांगमंच तळोधी...

‘त्या’दिव्यांगानी तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन प्रहार दिव्यांगमंच तळोधी (बॉ )परिसर संघटना व दिव्यांग सेवासंघर्ष ची मांगणी

37

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड – तालुक्यातील दिव्यांग बांधवाना अंत्योदय शिधापत्रिका ,५%दिव्यांग निधी वितरण ,५०%मालमत्ता करात सवलत, रोहयो च्या कामावर दिव्यांगाणा घेण्यात यावे अशी मागणी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था संलग्नीत प्रहार दिव्यांगमचं तळोधी (बॉ )व परिसर संघटना आणि दिव्यांग सेवा संघर्ष जनपरिसर संघटना मिंडाळा ने केली असून, या बाबतचे निवेदन दिनांक २ एप्रिल ला तहसिलदार आणि संवर्ग विकास अधिकारी नागभिड यांना सादर केले आहे.
भारतात साधारण २.२१टक्के लोकसंख्या दिव्यांग व्यक्तीची आहे. मात्र जागतिक मानंका नुसार हे प्रमाण ८ते १० टक्यापर्यंत असावे.शासनाच्या विविध योजना असल्या तरी शासनस्तरारून अमलबजावणी न झाल्यामुळे मात्र गरजु व पात्र दिव्यांग लाभार्थी वंचित राहतात.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत दिनांक २१ डीसेंबर २०२०च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून दिव्यांग व्यक्तींना सरसकट व तात्काळ लाभ देण्यात यावा असे निवेदन प्रहार दिव्यांग मंच आणि दिव्यांग सेवा संगर्ष संघटनेच्या वतीने तहसिलदार मनोज रामटेके यांना दिले आहे.
दिव्यांगाची शिक्षण, आर्थिक व रोजगाराची स्थिती अंत्यत हलाकीची व बिकट आहे. दिव्यांगात बेरोजगारीचे प्रमाण भरपुर आहे. दिव्यांगतवामुळे विवंचंना व अभाव असलेल्या दिव्यांग बांधवाना खऱ्या अर्थाने सक्षम करणे गरजेचे आहे.
शासन निर्णय २५जुन २०१४व २५.ऑकटो.२०१५ अन्वये अनुक्रमांक ९ मधील सुचनेनुसार दिव्यांग लाभार्त्यांना ग्रामपंचायत स्तरावरील ऐकून उत्पन्नातून ५%निधीचे वितरण थेट दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करावे,आणि कुटुंबं प्रमुखांची अट न लावता मालमता करामध्ये ५०%सवलत देण्यात यावी तसेच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार हमी योजनेच्या कामावर घ्यावे ह्या मागण्याचे निवेदन संवर्ग गटविकास अधिकारी अक्षय जे. सुक्रे यांना देण्यात आले आहे.
ही संघटना दिव्यांग व्यक्तीच्या विविध अधिकारावर काम करत असुन शासकीय योजना दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहचविणे, समाजात विखुरलेल्या दिव्यांगव्यक्तींना एकत्र करणे. शासनासोबत सुसंवाद साधने. दिव्यांग व्यक्तीच्या संदर्भात जाणीव जागृती, क्षमतावृधी, दिव्यांगाचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
यावेळी प्रहार दिव्यांगमच चे अध्यक्ष व पत्रकार तुलोपचंद गेडाम, दयालसिंग जुनी, देविदास कन्हाके ,संतोष वाढोणकर, रुपेश मऱ्हसकोले, मायाताई वासनिक,पंचफुला बारसागडे, पुनमकौर जुनी, प्रणय बांगरे, क्रिश वाकडे, सुनिताताई म्हस्के,प्रशांत सहारे, वैशाली शामकुळे, षडानण देशमुख ,तालुका समन्वयक नितेश नागापुरे, स्वयंसेविका अनिता बावनकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here