Home महाराष्ट्र कोण म्हणतं वाळू चोरी होत आहे, अरे! बाबांनो, हि तर महसुल खात्याची...

कोण म्हणतं वाळू चोरी होत आहे, अरे! बाबांनो, हि तर महसुल खात्याची शान आहे! वाळु चोरीचा धिंगाणा.

59

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी पाञातुन सातत्याने होत आसलेल्या अवैध वाळू उपसामुळे दक्षिण गंगा आसलेल्या गोदावरीचे वैभव नष्ट होतना दिसते. गंगाखेड महसुल प्रशासनाच्या निष्क्रिय मुळे वाळू चोरीचे प्रमाण वाढ दिसून येते .
लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागल्याने संपूर्ण तहसिल प्रशासन निवडणूकीचा कामात व्यस्त असताना गोदापाञात वाळू चोरीचा धिंगाणा घातला आहे.खळी बंधारा जवळील दुसलगाव परीसर महातपुरी झोला पिंपरी चिंचटाकळी धारखेड गंगाखेड सह गोदापाञात नियमबाह्य राञ दिवस वाळू उपसा जोमात सुरूच असून महसुल विभागाचे वाळू चोरा सोबत आसलेले संबधामुळे वाळू चोरी होत आहे अशी चर्चा होत आहे. महसुल प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होताना दिसत नाही महसुल विभागाने वाळू चोरी विरूद्ध कार्यवाहीसाठी नेमण्यात आलेली पथक हे नामधारी आसल्याचे दिसून येत आहे.दुसलगाव गोदाकाठ परिसरात वाळू माफियाने वाळू उपसा सुरू केला आसता दुसलगाव पोलिस पाटील सौ.संगिता कचरे यांनी चांगलाच विरोध केला होता . परंतू महसुल प्रशासन यांनी पोलिस पाटील सौ.कचरे यांच्या भूमिकेला महसुल प्रशासनाने साथ न देता वाळू चोरी करणाऱ्यांना साथ देत आसल्याचे बोले जात आहे .गोदावारी पाञातुन वाळू चोरी, बैलगाडी, गाढवांच्या माध्यमातून वाळू पाञावर जमा करून हायवा भरले जात आहेत. दररोज गोदापाञातून हजारो ब्रास वाळूचा खुलेआम उपसा होत आसल्याने गोदाकाठचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट होवून पर्यावरणाची हामी होताना दिसत आहे हि हानी भविष्यात न भरून येणारी आहे.या अवैध वाळू उपसाने गोदाकाठचा गावात पाणी टंचाईची समास्या तीव्र होत आसताना महसुल विभाग माञ काय घडतच नाही असे दिखावा दिसतो ,मूग गिळून गप्प बसले आहेत.
कलेक्टर साहेब गोदाकाठ वाचवा,महसुलवरच कार्यवाही करा.
दक्षिण गंगा गोदावरी गोदापाञ वाळू मुक्त होण्याचा मार्गावर आहे गोदापाञा वाळू चोरांचा धिंगाणा घातलेला आसाताना गंगाखेड महसुल विभाग माञ थातुर मातुर कार्यवाही करून दिखावा करताना दिसते. तहसिलदार यांनीच वाळू उपसामुळे मुळी बंधारा यास धोका आसल्याचे स्पष्ट केले होते बंधारा जवळील मुळी दुसलगाव गोदापाञातुन हजारो ब्रास वाळू झाला आहे आणी दररोज सुरूच आहे.पण कार्यवाही माञ शुन्य होताना दिसत यामुळेच महसुलवरच कार्यवाही करा अशी मागणी सर्वञ होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here