Home महाराष्ट्र पीडीसीसी बँकेचा ६० वर्धापनदिनी पीव्हीजी पतसंस्थेतर्फे सन्मान

पीडीसीसी बँकेचा ६० वर्धापनदिनी पीव्हीजी पतसंस्थेतर्फे सन्मान

34

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके टिळक रोड शाखेचा दि.२७.३.२०२४ रोजी (तुकाराम बीज दिनी ) ६० वा वर्धापन दिनी पुणे विध्यार्थी गृह सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे तर्फे संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक मा.सौ.धनश्री खंडागळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.प्रवीण शिंदे ,विभागीय अधिकारी मा.अनंत मोहिते ,कॅशिअर मा.जनश्री चौधरी , क्लार्क मा.अर्चना पिलाणे तसेच शिपाई आदेश जाधव उपस्थीत

होते. याप्रसंगी संचालक प्रवीण शिंदे यांचा धनश्री खंडागळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर अनंत मोहिते यांनी रघुनाथ ढोक यांचें स्वागत केले.

यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की ज्या प्रमाणे तुकाराम महाराज यांनी समाजामध्ये जावून भजनाचे माध्यमातून लोकांचे प्रबोधन करून अनेक अनिष्ठ रूढी परंपरा यांना छेद देण्याचे काम केले. निस्वार्थी पणे कोणतेही मानधन न घेता समाजसेवा केली त्याप्रमाणे काम करणारी मंडळी आज सापडणे मुश्कील झाले आहे. परंतु बँकेचे माध्यमातून ही बँक ग्राहकांना मनोभावे सेवा नियमित देते. कर्मचारी अल्प वेळेत चांगली सेवा देत गरजूंना योग्य मार्गदर्शन करीत वेळोवेळी आपुलकीने मदत करीत असते, ही पण एक चांगली सेवाच आहे. पुढे ढोक म्हणाले की ही बँक जशी ग्राहकांना चांगली सेवा देते त्याच प्रमाणे ज्या ज्या पतसंस्थेचे खाती यांचेकडे आहेत त्या पतसंस्थाना देखील योग्य प्रकारे सहकार्य करून पतसंस्थेचे वार्षिक सभेनंतर लाभांश वाटप करताना उशिरा पर्यंत थांबून सेवा देऊन विविध प्रकारची मदत देखील करते त्यामुळे त्यांचे सर्वांनी कौतुक केले पाहिजे असे देखील ढोक म्हणाले.

यावेळी सर्व सभासदांचे साक्षीने संचालक प्रवीण शिंदे यांनी ६० वा वर्धापनदिन निमित केक कापून सर्वाना पानसुपारी गुलाबफुल देऊन स्वागत करीत सर्वाना यानिमित अल्पोहार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here