Home धरनगाव ‘तुनी अदावर दीवाना’ हे अहिराणी गाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी होणार प्रदर्शित ...

‘तुनी अदावर दीवाना’ हे अहिराणी गाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी होणार प्रदर्शित धरणगांवात झाले गाण्याचे चित्रीकरण : नागरिकांनी देखील केला जल्लोष

70

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत असलेल्या एका युवकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून यू ट्यूब चॅनेल काढून अहिराणी गाण्यांची मालिका सुरू केली आहे. स्वतःची ‘माधुरी फिल्म प्रोडक्शन म्यूजिक कंपनी’ त्याने सुरु केली आहे.
हा युवक मनसे चित्रपट सेनेचा धरणगांव तालुका अध्यक्ष व महात्मा फुले हाइस्कूलचा माजी विद्यार्थी समाधान सुरेश माळी असून त्याने अहिराणी चित्रपट क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. नुकतेच त्याने धरणगांव शहरात ‘तुनी अदावर दीवाना’ या अहिराणी गाण्याचे चित्रीकरण केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याच्या या चित्रीकरणाला उस्फूर्त असा प्रतिसाद देत जल्लोष केला. या गाण्याचे दिग्दर्शन स्वतः समाधान माळी व धरणगांव – जळगांव डेली सर्विसेजचे मालक सोनू चौधरी या दोघांनी या गाण्याचे निर्माण केले आहे.

गाण्याचे गायण सुप्रसिद्ध कलाकार प्रशांत देसले सर यांनी तर संगीत मयूर साळुंके यांनी दिले आहे. साउंड डिझाइन सुप्रसिद्ध राजस स्टूडियोचे डी. जे. गोलू धरनगांव यांनी केले आहे. गाण्यात मुख्य भूमिका ही खान्देशचे सुपरस्टार अजय कुमावत व स्नेहा बडगुजर यांनी साकारली आहे. यांच्या सह कलाकार समाधान माळी व बाल कलाकार तनु सोनू चौधरी असून गाण्याला कोरियोग्राफ संदीप डि पटोले यांनी केले आहे. गाण्याचे चित्रीकरण राजमुद्रा फोटो स्टूडियोचे आशुतोष जाधव यांनी केले. गाण्याच्या संपूर्ण चित्रीकरणास गावातील नागरिकांचे व मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले. ‘तुनी अदावर दीवाना’ हे अहिराणी गाणे लवकरच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माधुरी फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या ‘माधुरी फिल्म प्रोडक्शन’ या यूट्यूब चैनल वर प्रसिद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here