Home चंद्रपूर मनोरुग्ण निराधार अनाथांची सेवा करणे हे फार मोठे धाडसाचे कार्य आहे. –...

मनोरुग्ण निराधार अनाथांची सेवा करणे हे फार मोठे धाडसाचे कार्य आहे. – राज्य पुरस्कृत साहित्यिक राजेश बारसागडे यांचे प्रतिपादन

56

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज निवारा गृहाचे भूमिपूजन समारंभ.

नागभीड—मनोरुग्ण,निराधारांची सेवा करणे फार मोठे कठिण आणि धाडसाचे कार्य आहे.समाजांनी दुर्लक्षित केलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रहावात आणण्याचे कार्य गावातीलच एक होतकरू परमेश्वर मडावी नावाचा तरुण डोमाजी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून करतो आहे.आणि आता तर अशा लोकांना राहण्यासाठी निवारा गृहाची व्यवस्था ही तो करतो आहे. हे असामान्य कार्य करण्याचे धाडस त्यांनी पेलले आहे. हे कौतुकास पात्र आहे असे मनोगत महाराष्ट्र शासन ‘बालकवी’ पुरस्कृत कवी तथा ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष राजेश बारसागडे यांनी व्यक्त केले.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील मनोरुग्ण,निराश्रित,अनाथ लोकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या डोमाजी आधार फाउंडेशन तर्फे येथील दानवीर शेतकरी रामकृष्ण मसराम यांनी डोमाजी आधार फाउंडेशला दान दिलेल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज निवारा गृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे उदघाटन साहित्यिक,पत्रकार राजेश बारसागडे व सामाजिक कार्यकर्ते रवी चल्लावार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यस्थानी नांदेडचे माजी उपसरपंच दुर्वेश रामटेके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मुर्लीधर गौरकार,राजू बन्सोड,हिराचंद बारसागडे, पत्रकार तुलोपचंद गेडाम,प्रा. हिरालाल बन्सोड,ग्रा.पं.सदस्य रजनी कुंभारे,शीतल बारसागडे, जयदा खोब्रागडे, मेघराज खोब्रागडे,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर,बिरसा मुंडा,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ.अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या प्रतिमेची पूजन करून पुष्पमाला अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले.यानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील पॅथॉलॉजिस्ट, सामाजिक कार्यकर्ते डॉ.रवी चल्लावार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज निवारा गृहाचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात दुर्वेश रामटेके यांनी परमेश्वर मडावी यांच्या मागील पाच वर्षाच्या मनोरुग्ण, निराधारांच्या सेवेचा गोषवारा सांगितला. व त्यांचे हे सेवाभावी कार्य तडीस नेण्यासाठीमित्र मंडळी सदा तत्पर असल्याची हमी दिली.रवी चल्लावार यांनी परमेश्वर मडावी हा उमदा तरुण समाधान दूर सारलेल्या वेड्या, मनोरुग्न लोकांसाठी कार्य करतो आहे.हे कार्य परमेश्वराचे कार्य आहे. पण परमेश्वरच्या नावातच ‘परमेश्वर’ आहे. याची खात्री पटली. आणि सर्वतोपरी आर्थिक मदत करून या समाजसेवी कार्यात हातभार लावण्याचे भाग्य मिळाले.असे विचार व्यक्त केले.याशिवाय राजू बन्सोड,प्रा. बन्सोड,सरपंच मुर्लीधर गौरकार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोमाजी आधार फाउंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष परमेश्वर मडावी यांनी केले.संचालन सुबोध खोब्रागडे यांनी केले. तर आभार कार्तिक उईके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here