Home चंद्रपूर चोरीच्या घाटात पळापळीच्या नादात युवकाने स्वतःचाच जीव गमावला

चोरीच्या घाटात पळापळीच्या नादात युवकाने स्वतःचाच जीव गमावला

116

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी- ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव ( देऊळगाव)  येथिल वैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास रेतीचे अवैध्य उत्खनन सुरू असताना पळापळीच्या नादात ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन दबून मृत्यू झाल्याची घटना आज दि. 15 मार्चला सकाळी पहाटेच्या सुमारास घडली . गोलू उर्फ प्रणय गुरुदेव धोटे वय 20 वर्ष रा.देऊळगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.

मागील वर्षी ब्रह्मपुरी तालुक्यातील काही रेती घाटांचा लिलाव झालेला होता.बेलगाव ( देऊळगाव) येथीलही रेती घाटाचा लिलाव झाला होता.मुदतीमध्ये रेती साठ्याची विक्री न झाल्याने रेतीसाठा शिल्लक होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील स्वतःला मोठा राजकीय पुढारी मानणारा नेता व भंडारा जिल्ह्यातील  एका  रेती व्यवसायिकाने शिल्लक रेती साठा विक्रीची परवानगी प्राप्त केली. असून या परवानगीच्या नावावर ठेकेदाराने नदीपात्रामधून 14 मार्चच्या रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरने रेती उपसा करण्याचा काम सुरू केले असल्याचे  घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले.  वैनगंगा नदी पात्रातून रात्रौ ट्रॅक्टर द्वारे रेती उपसा करण्याचे काम सुरू होते. अशातच अधिकारी येत असल्याची चाहूल लागल्याने घाटावरील दिवानजी यांनी सर्व ट्रॅक्टर वाल्यांना  ट्रॅक्टर लपविण्याकरिता सतर्क केले . दरम्यान देऊळगाव येथील तलमले यांच्या मालकीच्या असलेल्या ट्रॅक्टर वर चालक म्हणून असलेला प्रणय गुरुदेव धोटे यांनीही ट्रॅक्टर लपविण्याच्या नादात घाटात जवळ असलेले शेतामध्ये जोराने वाहन नेल्याने ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना घडतात ठेकेदाराची सर्व माणसे घटनास्थळावरून पसार झाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती . काही वेळ कुटुंबीयांनी मृतदेह उचलण्यास नकार दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार व पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कावळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थितांना व कुटुंबीयांना समजावून सांगितले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविले.
चोरीच्या घाटात ट्रॅक्टर  पळापळीच्या नादात कुटुंबीयांना एकुलता एक असलेल्या तरुणाला जीव गमावावा लागल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  बेलगाव रेतीघाटावरील रेती चोरीला आळा घालण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रकाश कावळे, आत्राम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here