Home महाराष्ट्र महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव लिहण्याचे शासनाचे निर्देश द्यावे ...

महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव लिहण्याचे शासनाचे निर्देश द्यावे बालिका दिनाच्या दिवशी पुरोगामीने केली होती शासनाकडे मागणी..

57

 

 

कार्यकारी संपादक//उपक्षम रामटेके

चंद्रपूर : विद्यार्थ्यांचे नाव शाळेत दाखल करताना वडिलांच्या नावापूर्वी आईचे नाव लिहण्याचे निर्देश शासनाने लवकरात लवकर देवून सावित्रीच्या लेकींचा सन्मान महाराष्ट्र शासनाने करावा अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे बालिका दिनाचे औचित्य साधून शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती या निवेदनाची दखल घेत नुकत्याच 14 मार्चच्या शासन निर्णयाद्वारे सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्याध्यक्ष डॉ.अल्काताई ठाकरे यांनी शासनाकडे पाठवलेल्या निवेदनात क्रांतीसुर्य जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानातून स्त्री शिक्षित झाली, आज पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात ती अग्रेसर आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिताना आईचे नाव लिहिले जात नाही. याकडे पुरोगामी शिक्षक संघटनेने शासनाकडे वेळोवेळी मागणी करून लक्ष वेधले होते. या मागणीची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास विभागाने सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर अर्जदार नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव असे सलग लिहिण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये जन्म दाखला, शाळा प्रवेश आवेदनपत्र,
सर्व शैक्षणिक कागदपत्रे, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक, जमिनीचा सातबारा, संपत्तीचे सर्व कागदपत्र व सॅलरी स्लिप, रेशन कार्ड, मृत्यू दाखला इत्यादी चा समावेश आहे. याबद्द्ल पुरोगामी शिक्षक संगबतनेच्या वतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे यापुढे यथावकाश सर्वच व्यक्तिंच्या आधार व पॅन कार्डासह सर्वच नोंदीतही तशी दुरूस्ती करण्यात यावी. अशी मागणी सुद्धा संघटना यावेळी करत आहे.
संघटनेचे राज्य पदाधिकारी विजय भोगेकर, प्रसाद पाटील, हरिश ससनकर, प्रकाश पाध्ये, बालाजी पांडागळे, भुपेश वाघ, महिला मंच राज्य पदाधिकारी चंदा खांडरे, डॉ.अलका ठाकरे, शारदा वाडकर, रुखमा पाटील, उपाध्यक्ष जी एस मंगणाळे आदींनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here