Home धरनगाव धरणगाव येथील पी आर हायस्कूलच्या १९६१ ते १९६५ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन...

धरणगाव येथील पी आर हायस्कूलच्या १९६१ ते १९६५ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात..

107

 

प्रतिनिधी – पी डी पाटील सर

शतकोत्तरी पी आर हायस्कूल धरणगाव येथील सन १९६१ ते १९६५ चे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे उत्साहात संपन्न झाले .

प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प रा विद्यालय धरणगावचे विद्यमान अध्यक्ष श्री अरुणजी कुलकर्णी , वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणासो मधुकर रामजी चौधरी , माजी गुरुवर्य शिरीष बाचपेयी सर , प रा विद्यालयचे संचालक अजय पगरिया , कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव चे माजी प्राचार्य टी एस बिराजदार सर , प रा विद्यालयचे मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे सर , वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेचे सचिव विनोद चौधरी सर , उपाध्यक्ष प्रमोद चौधरी सर ,आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ वैशाली चौधरी मॅडम व सन १९६१ ते १९६५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी भगवान भिवसन पाटील , सुरेश रुमाले , लालदास गुजराथी , डी एन पाटील आदींनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या गुरुजनांचे ऋण प्रकट केले व पी आर हायस्कूल धरणगाव , आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री यांना पुस्तक संच भेट दिला.

वेदमाता गायत्री बहू. संस्थेचे अध्यक्ष आणासो मधुकर रामजी चौधरी , डॉ संजीवकुमार सोनवणे , अजय पगरिया यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सतिष शिंदे यांनी केले तर आभार पी आर हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा धरणगाव तालुका अध्यक्ष सेवानिवृत्त संघ धनराज हरी पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here