Home महाराष्ट्र पत्रकार दत्ता खंदारे ‘संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित!

पत्रकार दत्ता खंदारे ‘संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित!

37

 

धारावीतील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक आणि पत्रकार, ‘साप्ताहिक भगवे वादळ’चे संपादक दत्ता श्रावण खंदारे यांना बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने “संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज भूषण “पुरस्काराने खासदार राहूल शेवाळेजी आणि मा. नगरसेविका आशाताई मराठे यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.या
यावेळी मंचावर श्री संजय खामकर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, चर्मकार विकास संघ ), श्री निवृत्ती सावळकर (अध्यक्ष, समस्त कक्कया समाज महासंघ ),श्री मनोहर रायबागे (अध्यक्ष, लिम्मा ), श्री शिवलिंग व्हटकर (अध्यक्ष, संत कक्कया विकास संस्था ), श्री मनी बालन (अध्यक्ष, धारावी विधानसभा भाजपा )श्री राजेश खंदारे (सचिव, संत कक्कया विकास संस्था )तसेच संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती महोत्सव समिती चे आयोजक श्री सुभाष मराठे, श्री राजेश सोनवणे, श्री चंद्रकांत पोटे, श्री अंकुश हजारे,श्री राम कोकणे, श्री नरसिंग कावळे, श्री रोहिदास उगले, श्री सुनिल कांबळे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
पत्रकार दत्ता खंदारे यांनी गेल्या २८वर्षाच्या कालावधीत विविध दैनिक, साप्ताहिक आणि मासिकांमध्ये सामाजिक समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे संबंधित खात्याकडे पाठवून समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. पत्रकार दत्ता खंदारे यांना आजपर्यंत पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार (इंदौर), राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, साहित्य रत्न लोकसेवा पुरस्कार, महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार, महाराष्ट्र संपादक भूषण आणि मुबंई वृत्तपत्र लेखक संघटनेचा जागृत नागरिक तसेच पत्रभूषण पुरस्कार, हिंदुस्थान ‘बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्कार आणि नुकतेच त्यांना कार्यदर्पण पुरस्कारने गौरवण्यात आले. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार दत्ता खंदारे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली)चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप देखील प्राप्त झाला असून पुन्हा एकदा” संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने समाजात विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे.
_________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here