Home महाराष्ट्र सलाम किसानने पालघर येथील आदिवासी महिलांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला महिला जागतिक दिन...

सलाम किसानने पालघर येथील आदिवासी महिलांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला महिला जागतिक दिन साजरा

56

 

पालघर – सलाम किसान, मुंबई व पालघरच्या कृषी विज्ञान केंद्र (KVK), कोसबाड यांनी संयुक्त विद्यमाने पालघर येथील *तुसे* गावातील आदिवासी महिलांसोबत *जागतिक महिला दिन* साजरा केला. त्यामध्ये मशरूमची शेती कशी करायची व त्यासाठी काय काय संसाधने लागतात त्याबद्दल कु. रुपाली देशमुख, मुख्य मार्गदर्शक, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र (KVK), कोसबाड यांनी संपूर्ण माहिती दिली. सोबत कार्यक्रमध्ये सलाम किसानच्या संस्थापिका कु. धनश्री मानधनी, सलाम किसान, मुख्य कार्यकारीअधिकारी, अक्षय खोब्रागडे, सलाम किसान, व्यवस्थापक – डिझाइन अँड इव्हेंट्स, सुमित मुंगले व कृषी सहाय्यक कु. प्रगती कराळे व इतर सलाम किसान चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सलाम किसानच्या संस्थापिका, धनश्री मानधनी सोबतच त्यांना मोठ्या प्रमाणात कश्या पद्धतीने बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते व येत्या काळात त्यांना सलाम किसान मार्फत बाजारपेठ उपलब्ध करून देऊ यावर चर्चा केली. या कार्यक्रमा अंतर्गत तांत्रिक साहाय्य कोसबाद् हिल्स्, KVK कडून करण्यात आले तर आर्थिक साहाय्य सलाम किसान कडून करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संजीवनी मोकशे यांनी मोलाचे योगदान दिले. याबद्दल सर्व महिलांनी पुढील सहकार्याबद्दल् वचनबध्ध्ता व हमी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here