Home महाराष्ट्र धरणगावच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण २९० प्रकरणं निकाली न्यायालयीन व वादपुर्व...

धरणगावच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण २९० प्रकरणं निकाली न्यायालयीन व वादपुर्व खटल्यातील ९९ लाख ३९ हजार ८१७ रुपयाची रक्कम वसूल

52

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : येथील जिल्हा विधी सेवा समितीतर्फे (दि.३ रविवार) रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात न्यायालयातील एकुण २६८ प्रकरणापैकी ६३ प्रकरणे तडजोडी अंती निकाली काढण्यात आली व एकुण रक्कम रूपये ३७९६०१६ वसुल करण्यात आले. तसेच वादपुर्व खटल्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, महाराष्ट्र बँक, विविध बँका, ग्रामपंचायत, दुरसंचार विभाग यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात एकुण १२०४ बाद पुर्व प्रकरणापैकी २२७ इतके प्रकरणे तडजोडी अंती निकाली काढण्यात आले, त्यात एकुण रक्कम रूपये ६१४३८०१ वसुल करण्यात आले. फौजदारी खटल्यातील खावटी केसमधील एका प्रकरणातील तडजोडी अंती समोपचाराने दोन्ही पक्षकारांची तडजोड करण्यात आली. त्यात स्वखुशीने दोन्ही पक्षकार राजी होवुन एकत्र राहण्यास तयार झाले. सदर प्रकरणात पॅनल प्रमुख ॲड आशिष सूर्यवंशी, पॅनल पंच ॲड प्रशांत क्षत्रीय तसेच जेष्ठ विधिज्ञ ॲड सी झेड कटयारे, ॲड. शिंदे यांच्या मध्यस्थीने व समोपचाराने प्रकरण मिटविण्यात आले. राष्टीय लोक अदालत यशस्वीतेसाठी पॅनल प्रमुख ॲड.आशिष द. सूर्यवंशी, पॅनल पंच ॲड. प्रशांत डी क्षत्रीय जेष्ठ विधिज्ञ सी झेड कटयारे, ॲड. राहुल पारेख, ॲड. व्ही एस भोलाणे, ॲड.हर्षल चव्हाण, ॲड.जी एस मांडगे, ॲड. विक्रम परिहार, ॲड.डि ए माळी, ॲड. सुतारे, ॲड.आर एस शुक्ला, ॲड एस बी शुक्ला, ॲड संदीप पाटील तसेच न्यायालयीन सहायक अधिक्षक जे ओ माळी, एस पी चौधरी यांसह वरिष्ठ लिपीक, एस बी भालेराव क.लिपीक आर आर साळे, जी सी लांबोळे, एल एम विसावे, एस बी पाटील, एस आर बाविस्कर, लघुलेखक वाय पी शिंदे शिपाई आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here