Home महाराष्ट्र पत्रकार भावनाशील चालेल पण क्षमावादी नसावा – साहित्यिक सज्जन यादव

पत्रकार भावनाशील चालेल पण क्षमावादी नसावा – साहित्यिक सज्जन यादव

62

 

कराड: निर्भीड पत्रकारितेतून समस्यावर प्रकाश टाकण्याची आणि प्रबोधनाची अपेक्षा करताना पत्रकार भावनांशील असला तरी चालेल पण क्षमावादी नसावा, असे मत साहित्यिक सज्जन यादव यांनी व्यक्त केले.

कराड येथील इंद्रधनू विचारमंच फौंडेशन यांच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतच्या सौ. सरिता घारे होत्या. यावेळी दैनिक तरुण भारत चे कार्यालय प्रमुख देवदास मुळे होते. यावेळी लोकमतचे कार्यालय प्रमुख प्रा. प्रमोद सुकरे यांनी *गाव सुटना* ही अतिशय सुंदर कविता सादर केली. कार्यक्रमात दैनिक पुढारी चे चंद्रजित पाटील आणि तिरंगा रक्षक चे संपादक विश्वास मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सज्जन यादव म्हणाले, पत्रकारिता करीत असताना शब्दांचे भांडार त्याच्याजवळ असणे महत्वाचे आहे. आज पत्रकारितेपुढे व्यावसायिकतेचे मोठे आव्हाने आहेत, हे जरी वास्तव असले तरीमात्र पत्रकारिता समाज परिवर्तनाचे मोठे साधन आहे याचेही भान असणे गरजेचे आहे.
यावेळी देवदास मुळे म्हणाले, पत्रकारांचे मराठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी वाचन गरजेचे आहे. इंद्रधनू विचार मंच फौंडेशन च्या कार्यशाळेचे विशेष कौतुक करून अशा कार्यशाळा भविष्यात वारंवार व्हाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली.
कार्यशाळेस पुढारीचे कार्यालय प्रमुख सतीश मोरे सकाळचे कार्यालय प्रमुख सचिन शिंदे, प्रीतीसंगम चे संपादक शशिकांत पाटील, सामनाचे पत्रकार गोरख तावरे, हेमंत पवार, महेश सूर्यवंशी, सकलेन मुलाणी, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते, वसंतराव शिंदे, अक्षय मस्के, सुहास कांबळे, अमोल टकले उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विकास भोसले, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, नितीन धापरे, माणिक डोंगरे, संदीप चेणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक अशोक मोहने यांनी केले, सूत्रसंचालन प्रमोद तोडकर यांनी केले तर आभार माणिक डोंगरे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here