Home महाराष्ट्र वाई येथील हरिहरेश्वर बँक घोटाळा प्रकरणी शिक्षेची पत्रकार परिषदेत मागणी….

वाई येथील हरिहरेश्वर बँक घोटाळा प्रकरणी शिक्षेची पत्रकार परिषदेत मागणी….

93

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100*

म्हसवड : दक्षिण काशी असं संबोधणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर बँक घोटाळा प्रकरणी संबंधित काही आरोप यांना शिक्षा व्हावी. यासाठी गेले दोन वर्ष पाठपुरावा करत आहे. पण, यश मिळत नाही. अशी खंत या घोटाळ्याच्या अनुषंगाने श्री नितीन सावंत यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केलेली आहे. तसेच या बँकेचे संचालक मंडळ इतर जबाबदार व्यक्तींवर दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक १७६/२०२१ नुसार वाई पोलीस ठाणे या गुन्ह्यांमध्ये गुन्हा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी. अशी मागणी केलेली आहे.
सातारा येथे वाई सोनगीर वाडी येथील रहिवाशी नितीन सावंत यांनी सातत्याने दोन वर्ष पाठपुरावा करत आहेत. तरीसुद्धा त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याबाबत आर्थिक गुन्हा शाखा व केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री, गृह सचिव ,पोलीस महानिरीक्षक, सातारा पोलीस अधीक्षक अशा अर्धा डझन संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र व्यवहार केले आहेत .त्यांचा रोष हा या बँकेचे कायदेशीर सल्लागार असणाऱ्या व्यक्तीवर असून कायदेशीर सल्लागार हे बँकेचे कर्ज प्रकरण मंजुरी बाबत कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतात. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांचा समाविष्ट करावा असा अर्ज त्यांनी दिला आहे. परंतु त्यांच्या ऐवजी त्यांच्याकडे शिक्षण घेणाऱ्या वकिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक तसेच काही संचालक यांना अटक सुद्धा झालेली आहे.
या हरिहरेश्वर बँकेचा पहिला गुन्हा हा ३७ कोटी ४४ हजार रुपयाचा झाला आहे. त्यामध्ये ११२ कर्ज प्रकरण बनावट व बेकायदेशीर असल्याचे माहिती श्री सावंत यांनी दिलेली आहे. काही कर्ज प्रकरणे हे कायदेशीर सल्लागाराच्या नातेवाईकां ंच्या बाबत असल्यामुळे या गोष्टीकडे फारच गांभीर्याने तपास होत नाही. सर्व फांद्या व खोड कापले जाते पण मुळाला हात घातला जात नाही. असा त्यांनी आरोप केलेला आहे. त्याबाबतची त्यांनी कागदपत्र सातारा येथील पत्रकारांना दाखवून माहितीच्या अधिकारातही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण माहिती गोळा केलेली आहे.
विशेष बाब म्हणजे संबंधित कायदेशीर सल्लागार म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक ठराव क्रमांक दिनांक 15 १५/९/२०११ रोजी केलेली आहे. त्या व्यक्तीला फी अदा केलेली नाही. असे हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या प्रशासकांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्राद्वारे कळविलेले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपी मयत झाले असून इतर चार आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. एकूण आरोपींची ३५ एवढी संख्या आहे तर एका आरोपीला जामीन मंजूर झाल्यामुळे एकदाच ते वाई पोलीस ठाण्यात हजेरी लावून निघून गेल्या असल्याची माहिती श्री नितीन विलासराव सावंत या सोनगिरवाडी येथील व्यक्तीने जन माहिती अधिकारात उघड केलेली आहे.
सदर न्यायप्रविष्ठ बाब असल्यामुळे याबाबत संबंधितांनी फारशी माहिती देणे टाळले आहे. दरम्यान ,या प्रकरणाबाबत कायदेशीर सल्लागाराची भूमिका निश्चित करूनच पुढील कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान याबाबत संबंधित व्यक्तींशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here