Home विदर्भ ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हल्लेखोरांना अटक करा प्रेस संपादक व...

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हल्लेखोरांना अटक करा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देवणी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे मागणी

124

 

देवणी : प्रेस सपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांना १२ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले. राष्ट्र सेवा दलाने ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, वरील विषयी निवेदन देण्यात येते की, दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲड.असिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असतांना हल्लेखोरानी अतिशय क्रुरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील व्यक्तींचा बचाव केला. या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्ले खोरावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे ही विनंती. असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर गिरीधर गायकवाड बालाजी टाळीकोटे, प्रा. नरसिग सूर्यवंशी, जयेश ढगे, कृष्णा पिंजरे, भैय्यासाहेब देवणीकर, दिलीप शिंदे, विक्रम गायकवाड, गजानन गायकवाड, बबन सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी, रमाकांत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, आदीच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here