Home यवतमाळ भारतीय विद्यार्थी मोर्चा विडुळ सर्कल कमिटी गठित

भारतीय विद्यार्थी मोर्चा विडुळ सर्कल कमिटी गठित

90

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो. 9823995466

उमरखेड (दि. 6 फेब्रुवारी) भारतातील अठरापगड जाति धर्मातील विद्यार्थ्यांना महापुरुषांची विचारधारा सांगून,जागृत करून त्यांना व्यवस्था परिवर्तनासाठी तयार करण्याचे काम देशभरात भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघतनेद्वारे करण्यात येते.
आज भारतातील 31 राज्य आणि 567 जिल्ह्यांमध्ये पसरलेले एकमेव राष्ट्रव्यापी विद्यार्थी संगठण म्हणून देशभर भारतीय विद्यार्थी मोर्चा ची ख्याती आहे.

ह्या संघटने द्वारे विडूळ येथे काल प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षस्थानी विद्वान केवटे राष्ट्रीय महासचिव भारतीय युवा मोर्चा नवी दिल्ली हे होते.
“भारतातील विद्यार्थ्यांनी जागृत होऊन महापुरुषांच्या विचार स्वीकारून वाटचाल केल्या शिवाय विद्यार्थी युवकांच्या जाती धर्माच्या नावावर होणार वापर थांबविल्या जाऊ शकत नाही.
हे थांबविण्यासाठी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रव्यापी संघटन बनवून लढा उभरल्याशिवय पर्याय नाही.”

असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी तालुका कृषी अधिकारी, अशोक भालेराव हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भारत मुक्ती मोर्चा चे विनोद बनसोडे तथा विडूळ चे उपसरपंच जगदीश धुळे हे होते.
दरम्यान अमित केंद्रेकर,रवी धुळे, अतिश खिल्लारे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या अध्यक्ष पदि विक्रम धुळे,उपाध्यक्ष पदी अमित केंद्रेकर,रवी धुळे,सुमेध काळबांडे यांसह पदाधिकारी म्हणून अतीश खिल्लारे,आशिष धुळे,कारण गिरबिडे,सचिन वाढवे, बद्धभूषण पातोडे,करण काळबांडे,तुषार भगत,निरंजन धुळे, सुशांत धुळे,संघर्ष पाईकराव यांची नियुक्ती करण्यात आली.

महापुरुषांचा विचार अठरापगड जाती धर्मातील पोहोचवून समता, स्वतंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित समाज निर्मितीचा यावेळी विद्यार्थ्यांनी संकल्प केला.

या कार्यक्रमाच्या यावेळी विश्वजित धुळे,माधव धुळे,चैतन्य धुळे, आकाश धुळे, सुशांत धुळे,अजय काळबांडे,प्रथमेश धुळे,विक्रम धुळे,शैलेंद्र काळबांडे,निरंजन धुळे, शुद्दोधन इंगोले,योगेश धुळे,आकाश धुळे,विशाल दवने,प्रदीप सावते,युवराज सावते यांसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here