Home यवतमाळ जिल्हा परिषद निळापूर शाळेच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी तालुकास्तरीय महादीप परीक्षेतून जिल्हा...

जिल्हा परिषद निळापूर शाळेच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी तालुकास्तरीय महादीप परीक्षेतून जिल्हा स्तरीय अंतिम परीक्षेत झेप

44

 

सुनील शिरपुरे/यवतमाळ

यवतमाळ जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणारी महादीप परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात आगळावेगळा उपक्रम म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे राज्य, देश आणि जग अशा विषयांशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित ही परीक्षा घेतली जाते. तसेच शालेय अभ्यासक्रमात उपयोगी पडतील या दृष्टीने विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, मराठी भाषा, इंग्रजी भाषा या विषयांवरील प्रश्नांचाही यात समावेश असतो. एकंदर सात फे-यातून विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. वणी तालुक्यात १ फेब्रवारीला घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय महादीप परीक्षेत जिल्हा परिषद निळापुर शाळेतील पाच पैकी चार विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरी परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. या विद्यार्थ्यांची महादीप परीक्षा यवतमाळ येथे होणार आहे. या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.विधी अमरदीप वासेकर (प्रथम क्रमांक ), यश गोपाल बोढे ( व्दितीय क्रमांक ), सुनाक्षी विठोबा कळसकर (तृतीय क्रमांक ), अनुष्का रवींद्र ठाकरे (पाचवा क्रमांक ) हे चार विद्यार्थी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सरपंच पुजा बोढाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.पुष्पा कळसकर, मुख्याध्यापक सिद्धार्थ उराडे सर, शिक्षक आरीफ कच्छी सर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कळसकर व समस्त पालकांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here