Home महाराष्ट्र मतदार दिवसानिमित्त गो. सी. गावंडे महाविद्यालयात लोकशाहीचा जागर

मतदार दिवसानिमित्त गो. सी. गावंडे महाविद्यालयात लोकशाहीचा जागर

79

 

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 25 जानेवारी) उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय व राज्यशास्त्र विभाग गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविण्यात आले.

गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात आयोजित 14 व्या मतदार दिवसानिमित्त मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केल्यास जगातील सर्वात मोठी लोकशाही सुदृढ व बळकट करण्यास आपली भूमिका महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी केले. ते प्रमुख वक्ते म्हणून मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधवराव बी. कदम, प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, नायब तहसीलदार श्री. वैभव पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.एस. इंगळे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. वाय अनासाने, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. ए.पी मिटके, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख ले. एस. एस पाचकुडडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.

14 व्या मतदार दिवसानिमित्त सकाळी 9.00 वा महाविद्यालयाच्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून तहसीलदार आनंद देऊळगावकर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही.एस इंगळे, ठाणेदार शंकर पांचाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात केली.

दरम्यान गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तरुणांना मतदानाच्या बाबतीत जागृत करण्यासाठी पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
नंतर प्रांगणात मतदारासाठीच्या प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

दु. 1.00 वा महाविद्यालयात डॉ आत्मारामजी गावंडे म्युझियम हॉलमध्ये कृषी महाविद्यालय कुपटी येथील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीच्या दृष्टीने नाटीकेचे सादरीकरण केले.
तसेच कार्यक्रमात उमरखेड तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तालुक्यातील उत्कृष्ट बीएलओ म्हणून सेवा केलेल्या शिक्षकांचे सुद्धा उपविभागीय अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी मतदार राजा जागृत असणे आवश्यक आहे.

राजकीय सहभागीत्व वाढवून तरुणांची राजकारणातील सक्रियता देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नामलौकिक मिळवून देईल असे मत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही एस इंगळे यांनी व्यक्त केले.

ज्यांनी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली असेल अशा विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून मतदानाचे प्रमाण वाढविल्यास निष्पक्ष व जनताभिमुख सरकार सत्तारूढ होण्यास मदत होईल अशा प्रकारचे मत अध्यक्षीय समारोपादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. कदम यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही.एस. इंगळे यांनी केले. संचालन श्री. रमेश विणकरे तर आभार प्रदर्शन प्रो.डॉ.पी. वाय अनासाने यांनी केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी तहसील कार्यालयाचे कर्मचारी व विविध विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here