Home नाशिक सरदार राजोळे यांचे वंशज मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांची चांदवड येथे सदिच्छा...

सरदार राजोळे यांचे वंशज मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांची चांदवड येथे सदिच्छा भेट…

39

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक:- पानिपत हरियाणा येथून आलेले मराठा सरदार राजोळे यांचे वंशज मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांनी चांदवड येथे सदिच्छा भेट दिली असता चांदवड दुर्ग भ्रमंती मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
मराठ्यांनी पानिपत युद्धात मोठे शौर्य गाजवले. शौर्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातन मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी यावे यासाठी आमंत्रण देण्यासाठी व मराठा सरदार मल्हारराव होळकर यांच्या पदस्पर्शाने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ( होळकरवाडा ) रंगमहाल बघण्यासाठी त्यांचे चांदवड येथे आगमन झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत ईश्वरसिंग राजोळे , जोगिंदर सिंग राजे , सरदार भाऊसाहेब राजोळे , आदी वंशज त्यांच्यासोबत होते.
रंगमहाल ( होळकरवाडा ) बघून सध्या असलेली अवस्था… वाड्याची वाताहत… पाहून त्यांचे मन हेलावले… ही आपली विरासत आपण जोपासली पाहिजे मल्हार होळकरांचा पराक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सात्विकता या वाड्याला लाभलेली असताना देखील ही अवस्था लाजिरवाणी असल्याचे म्हटले. आपण हा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन मराठा रामनारायणजी राजोळे पानिपत यांनी केले.
याप्रसंगी पत्रकार उदय वायकोळे , प्रा. स्वप्निल वाघ , बाळा पाडवी , प्रफुल्ल सोनवणे , प्रशांत सुताणे सर , पिंटू राऊत , अनिल पेंढारी , संतोष सोनवणे पेशवे , पत्रकार सुनील अण्णा सोनवणे , समाधान बागल , दत्तात्रय बारगळ , अशोक काका व्यवहारे ,व चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here