Home पुणे साहित्यिक कलावंत संमेलनात रानकवी जगदीप वनशिव यांची निवड

साहित्यिक कलावंत संमेलनात रानकवी जगदीप वनशिव यांची निवड

107

 

पुणेः- येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलन शनिवार दिनांक २३ ते सोमवार २५ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले असून यंदाच्या साहित्यिक कलावंत संमेलनात निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे विविध विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि मान्यवरांच्या मुलाखती अशा भरगच्च कार्यक्रमांनी यंदाचे साहित्यिक कलावंत संमेलन विशेषत्वाने रंगणार आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि या संमेलनाचे मुख्य आयोजक माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी माहिती दिली. यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव आणि प्रसिद्ध साहित्यिक वि.दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे , उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, संचालक मंडळाचे सदस्य दिवाकर पोफळे बाळासाहेब गिरी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित केले आहे २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी ४.३० वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी २३ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आमदार भिमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत.
स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ यंदाच्या ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कला गौरव पुरस्कारांचे वितरण अंमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी साहित्य क्षेत्रासाठीचा ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कला गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांना तर कला क्षेत्रासाठीचा ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कला गौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता प्रा. प्रभाकर साळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात अनिल दीक्षित, संजय बोरुडे, भालचंद्र कोळपकर, चिन्मयी चिटणीस, प्रगती मोरे, शरद धनगर,रानकवी जगदीप वनशिव, प्रशांत केंदळे, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, श्रीनिवास मस्के, सुनंदा शिंगनाथ आणि आशा शिंदे हे कवी सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या शेवटच्या दिवशी सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी
संध्याकाळी ७.३० वाजता प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात अरुण म्हात्रे, भरत दौंडकर, संदीप जगताप, प्रा. वा. ना.आंधळे, ज्योत्स्ना चांदगुडे, हर्षदा सुखटणकर, सतीश सोळांकूरकर, दत्तात्रय जगताप, लक्ष्मण हेंबाडे , गो. शि. म्हसकर, जित्या जाली, दादाभाऊ गावडे आणि अंजली ढमाळ आदी कवी सहभागी होणार आहेत.अशाप्रकारे साहित्य संमेलनाची
कविसंमेलनाने सांगता होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here