Home अमरावती म. फुलेंचे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे विचार बाबासाहेबांनी तळागाळापर्यंत पोहोचविले-समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड

म. फुलेंचे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे विचार बाबासाहेबांनी तळागाळापर्यंत पोहोचविले-समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड

110

 

 

अमरावती (प्रतिनिधी )-महात्मा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे विचार हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळापर्यंत पोहोचविले त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामीत्व प्राप्त झाले.भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले. सामाजिक व्यवस्थेने गुलाम ठरविलेल्या समाजाला न्याय मिळवून दिला.त्या डॉ. आंबेडकरांचे कार्य हे सदैव प्रेरणा देणारे आहेत. ” असे प्रतिपादन सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी केले.
ते स्थानिक वऱ्हाड विकास व कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमामध्ये अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी संपत्त झालेल्या महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्रा. श्रीकृष्ण बनसोड होते तर प्रमुख मागदर्शक व वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले होते. प्रमुख अतिथी माजी नगरसेवक श्री सुरेश मेश्राम, डॉ.महेंद्र पवार (सिंदखेडराजा), प्रा. जयकुमार मेश्राम, अशोक बागडे होते.
अध्यक्ष,वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक महाकाव्यग्रंथात प्रकाशित झालेला तसेच स्वतःच्या ” अभंग तरंग ” या काव्यसंग्रहातील ” भीमराव ” या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

” बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांची आज गरज ”
– प्रा.अरुण बुंदेले
प्रमुख मार्गदर्शक व वक्ते प्रा. अरुण बुंदेले म्हणाले की ,” सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अतिशय अनमोल आहेत. वंचित व शोषितांसोबतच सर्वांना स्वातंत्र्य,समता व न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची वैचारिक मांडणी होती.बाबासाहेबांच्या क्रांतिकारी आणि मानवतावादी विचारांची आज आवश्यकता आहे.त्यांच्या मते लेखणीची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा कायम टिकणारी आहे.ती सर्वोत्तम शस्त्र आहे म्हणूनच तलवार हातात न घेता लेखणी हातात घ्या व अन्यायाविरुद्ध लढा.कर्तव्य व हक्काची जाणीव करून देणारे शिक्षण समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे.प्रज्ञा,शील व करुणा या गुणांच्या वृद्धीसाठी शिक्षणाची गरज असल्याचे बाबासाहेबांनी सांगितले.”असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा . जयकुमार मेश्राम तर आभार विलास ठाकूर यांनी मानले.
कार्यक्रमाला मंगेश रायबोले, अशोक बागडे, देवानंद चिंचखेडे, जीवनप्रकाश पांडे, कैलास पेंदाम, चंद्रकला वाघमारे, मीनाताई मेश्राम आणि फुले-शाहू – आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here