बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली त्यामुळे हा दिवस बंजारा समाज गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पुसद तालुक्यातील मांडवा येथील महानायक वसंतराव नाईक तांड्यात महानायक वसंतराव नाईक चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ अनिल पुलाते हे उपस्थित होते. तर. प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, तांड्याचे नाईक शेषराव आडे, तांड्याचे कारभारी सुदाम राठोड, महादेव डोळस, धर्मा राठोड, प्रकाश ढोले, रमेश ढोले, प्रेमसिंग चव्हाण, विलास आडे, कैलास राठोड, नामदेव राठोड,अशोक आडे, बाळु आडे, बाळु राठोड, सुभाष वानखेडे,विठ्ठल आडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर अनिल पुलाते यांच्या हस्ते तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अजय राठोड, नयन आडे, करण राठोड, सुनिल राठोड,अरविंद आडे, किशोर आडे, चेतन राठोड, प्रमोद आडे, विकास राठोड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिलीप आडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित राठोड यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर राठोड यांनी मानले.
