अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड (प्रतिनिधी) कार्पोरेट मुनाफेखोरीसाठी केंद्रातील भाजप सरकारने 38 कामगार कायदे मोडीत काढून कामगार कर्मचारी यांच्यावर कुऱ्हाड चालविली आहे. याच पावलावर पावले टाकीत महाराष्ट्र शासनाने कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाचा धडाका लावून बेरोजगार युवकांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आयटक या केंद्रीय कामगार संघटनेने निकराचा लढा पुकारला आहे.महाराष्ट्र राज्यात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी, आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार यातील महिला कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जाते. नप मनपा मधील सफाई कामगारांना महिनोनमहिने वेतन दिले जात नाही. हमाल माथाडी कामगारांना माथाडी कायद्याचे लाभ देण्याऐवजी माथाडी कायदा कायमचा मोडीत काढण्याची पावले सरकार टाकीत आहे. महाराष्ट्र राज्यातील हजारो साखर कामगारांची शेकडोकोटीची थकीत देणी सरकार आणि बँकांनी कोर्ट कचेऱ्यात अडकविली आहेत. विकास सोसायट्यांना स्वतंत्र अनुदान देवून गटसचिव कर्मचारी यांच्यासाठी वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्याकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. सातत्याने जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अद्याप देखील ना बोनस दिला ना प्रा फंड भरला. कंत्राटी वीज कामगार आरोग्य कर्मचारी आणि नर्सेस यांची कायम करण्यासाठी महिनाभर आंदोलने करून देखील शासन निर्णय जारी केला जात नाही. या सर्व खाजगीकरण आणि कंत्राटीकरण यामध्ये कंत्राटदार यांची मात्र मोठी चंगळ चालविली आहे. यातून जनतेला ना योग्य सेवा दिल्या जात आहेत ना व्यवस्थापनात सुधारणा केवळ कार्पोरेट कंपन्यांनी लुट चालविली आहे. अशा परिस्थितीत समाजात धर्म जाती बद्दल द्वेषभावना भडकावून दंगली समाजात अशांतता निर्माण केली जात आहे. संविधानाने दिलेले श्रमिकांच्या मुलभूत हक्कावर केलेला हल्ला कामगार लढ्यातून परतविण्याचा निर्धार आयटक संघटनेने केला आहे.कोल्हापूर येथून राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून सुरु झालेली हि यात्रा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीवर पोहोचणार आहे. हि यात्रा लाखो कामगारांसह मोर्चाद्वारे दि 18 डिसेंबर 23 रोजी सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर धडकणार आहे. कोल्हापूर येथून दि 20 नोव्हेंबर येथून सुरुवात करून महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यात महासंघर्ष जनजागरण यात्रा आयोजित केली. दि 7 डिसेंबर गुरुवार रोजी गंगाखेड शहरात मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत करण्यात आले. दिलकश चौकातुन रॅली काढण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभा घेण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व आयटक राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे, आयटक च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बबली रावत, राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड राजू देसले कॉ. राजन क्षीरसागर, नामदेव चव्हाण, शेख अब्दुल यांनी सभेला संबोधीत केले. कॉ ओंकार पवार यांनी सभेची प्रस्तावना केली तर सिद्धोदन भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्र संचालक शिवाजी कदम यांनी केले कार्यक्रमाचे आध्यक्षिय समारोप कॉ शेख सरवर भाई यांनी केले भगवान कनकुटे, कॉ आकाश,कॉ योगेश फड सहीत आयटक प्रणीत विविध संघटनेचे सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.