Home महाराष्ट्र बाबासाहेब जागतिक कीर्तिचे आदर्श विद्यार्थी होते-जयसिंग वाघ

बाबासाहेब जागतिक कीर्तिचे आदर्श विद्यार्थी होते-जयसिंग वाघ

112

 

 

जळगाव :- डॉ. बाबासाहेब हे ग्रंथ हेच गुरु व ग्रंथ हाच मित्र मानत होते . ते प्राध्यापक , वकील , आमदार , मंत्री होते पण त्यांनी कधीही या गोष्टीचा गर्व बाळगला नाही , ते प्रचंड विद्वान होते पण त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचाही गर्व बाळगला नाही ते स्वतःला एक विद्यार्थीच समजत आले व जनतेला सांगत आले की माणुस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो बाबासाहेबांनि त्यांच्या विद्वतयेतुन चारित्र्यातुन , राहनिमान यातून ते जागतिक कीर्तिचे आदर्श विद्यर्थि होते हे दाखवून दिले . असे विचार प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव येथील का. उ . कोल्हे विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करताना वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढं सांगितले की , बाबासाहेबांनी शिक्षण घेत असतांना विस् विस् तास अभ्यास केला एका वेळेस ते तीन तीन परीक्षाचा अभ्यास करत होते , ग्रंथालय केव्हा उघड़ते याची ते वाट पाहत असे तर ग्रंथालय बंद झाले की ते बाहेर पड़त असत , काही प्रसंगी शिपाई त्यांना बाहेर जाण्या विषयी सांगत असे. भारताचे संविधान लिहित असतांना त्यांनी पस्तिस पेक्षा अधिक संविधानाचा अत्यंत बारकाइने अभ्यास केला व रोज १८ – १८ तास बसून त्यांनी आपले संविधान लिहिले . मसूदा समितिच्या एकाही सभासदाने त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही असेही वाघ यांनी स्पष्ट केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका सौ . जे. आर. गोसावी होत्या , मंचावर व्ही. आर . कोल्हे , सौ . बी. एस. राणे , बी. बी. देवरे होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन व्ही. एच. नींभोरे यांनी केले .
सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले शेवटी वत्कृत्व स्पर्धेतिल स्पर्धाकांना सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संखेने हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here