Home चंद्रपूर चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

95

 

 

 

चिमूर- समग्र शिक्षा समवेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर अंतर्गत 3 डीसेंबर ते 9 डिसेंबर ला जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात आला .
दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व शिक्षणात ठीकुन ठेवण्या करीता पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका , समाज, शेत्रीय यंत्रणा , व सवंगडी याच्या साह्याने जनजागृती करण्यात आली. गटशिक्षाधिकारी पंचायत समिती चिमूर रुपेश कामडी यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण, गट साधन केंद्र , पंचायत समिती चिमूर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा यांचा संयुक्त विद्यमानाने दिंव्यागाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा येथे केंद्र प्रमुख विनोद भोयर यांनी लुई ब्रेल व हेलन केलर यांचा फोटोला हार अर्पण करून प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात आले, शाळेच्या शिक्षकांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थी व उपस्थीत गावकरी यांना समावेशीत शिक्षणाची संकल्पणा व त्यांना मिळणाऱ्या सुविधा बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर गावात प्रभातफेरी कडून जन जागृती करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थ्याच्या चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विविध खेळ घेण्यात आले, विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमात विनोद भोयर केंद्र प्रमुख जामगाव तथा मुख्याध्यापक , सचिन अण्णाजी लुहुरे समावेशीत शिक्षण तज्ज्ञ , गजानन काळे समावेशीत शिक्षण तज्ज्ञ , नरेंद्र काकडे विशेष शिक्षक, अतकरी सर , दंडारी मॅडम, अमृतकर सर उपस्थित होते, समता सप्ताह याप्रमाणे तालुक्यात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here