Home धरनगाव ओम शांती केंद्राकडून भाऊबीजेच्या दिवशी त्रिमूर्तीं शिक्षकांचा सन्मान !… भाऊबीजेच्या दिवशी...

ओम शांती केंद्राकडून भाऊबीजेच्या दिवशी त्रिमूर्तीं शिक्षकांचा सन्मान !… भाऊबीजेच्या दिवशी दीदींकडून अविस्मरणीय भेट – व्ही.टी.माळी सर

131

 

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील

धरणगांव – शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती केंद्र धरणगाव यांच्याकडून दीपावली सणाचे औचित्य साधून भाऊबीजेच्या दिवशी आदर्श शिक्षकांचा गुलाब पुष्प, लेखणी व सुविचार प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे आदर्श शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना धुळे येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते व महात्मा फुले हायस्कूल चे उपक्रमशील शिक्षक व्ही.टी.माळी यांना जळगाव येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते याचे औचित्य साधत ओम शांती केंद्रांच्या संचालिका निता दीदी यांच्याकडून या त्रिमूर्तीं शिक्षकांचा गुलाब पुष्प, लेखणी व सुविचार प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
भाऊबीजेच्या दिवशी आमचा दीदींनी सन्मान केला ही आमच्यासाठी अनोखी भेट ठरली व आमच्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण आहे. आपण केलेला सन्मान हा आमच्यासाठी ऊर्जादायी ठरेल व पुढच्या शैक्षणिक – सामाजिक कार्यासाठी अधिक बळ देणारा ठरेल असे प्रतिपादन तिन्ही शिक्षकांनी केले. याप्रसंगी ओम शांती केंद्राच्या सरिता दीदी, रामकृष्ण भाई महाजन, छोटू भाई तसेच सर्व ओम शांती केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कल्याणी दीदी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here