Home चंद्रपूर नागभीड नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य स्वागत-विकास कामांच्या निधीसाठी आम.भांगडीयांनी दिले...

नागभीड नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य स्वागत-विकास कामांच्या निधीसाठी आम.भांगडीयांनी दिले निवेदन

174

 

 

रोशन मदनकर,उपसंपादक मो. 88886 28986

 

नागभीड :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. परत जात असतांना नागभीड येथे रात्री नऊ वाजता राम मंदिर चौकात भाजपा कडुन आमदार किर्तीकुमार भांगडिया व त्यांच्या पदाधिकाऱ्यांन कडुन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नियोजित दौर्यीनुसार नागभीड नगरपरिषदेला भेट देणार होते. मात्र उशीर झाल्यमुळे नगरपरिषद चा कार्यक्रम रद्द करण्यात आले. यांची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली होती. त्यासाठी दुपारी पासुनच पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री नऊ वाजता च्या दरम्यान नागभीड शहर येथिल राममंदिर चौकात  दाखल झाले. त्यावेळी ढोल ताश्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करणयात आले. यावेळी सर्वप्रथम आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी त्यांचे स्वागत केले. चिमुर विधानसभे करीता विकास कामांच्या निधीसाठी निवेदन दिले. यांच्या सोबत भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, नगरपरिषद माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृ. उ. बा. स. सभापती अवेश पठाण, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे, नप. माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, जहाँगिर कुरेशी,होमदेव मेश्राम, राजेश घिये,राजु पिसे, संजय अमृतकर, शिरीष वानखेडे,बंडुभाऊ गेडाम, विजय काबरा, शुभम चिल्लुरे, दिनेश समर्थ, संजय मालोदे, रुपेश गायकवाड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्माणी, हनिफ जादा, विजय काबरा, विजय बंडावार,मुख्यमंत्री यांना बघण्यासाठी नागभिड शहरातील हजारोच्या संख्खेनी पुरुष व महिला मंडळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here