Home महाराष्ट्र सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कारासाठी रेश्मा पिरजादे व अस्मिता पवार यांची निवड

सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कारासाठी रेश्मा पिरजादे व अस्मिता पवार यांची निवड

123

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

 

म्हसवड -:-अग्रणी सोशल फौंडेशन विटा जि.सांगली वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व वंचित समाजाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणाऱ्या भटके विमुक्त समाजातील अस्मिता पवार ,विटा हायस्कूल विटा व अल्पसंख्याक समाजातील रेश्मा पिरजादे,शेठ च.ग.शहा विद्यामंदिर लेंगरे, या दोन्ही शिक्षिकेंना महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त ( खरा शिक्षक दिन) २८ नोव्हेंबरला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
भटके विमुक्त व अल्पसंख्याक समाजात शिक्षणाबाबत पाहिजे तेवढ्या प्रमाणात जनजागृती नाही.त्यामुळे या दोन समुहातील शिक्षकांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध भटकेविमुक्त समाजातील साहित्यिक अशोक पवार व ग्रामीण पत्रकार सादिक खाटीक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ज्या महामानवाने उपेक्षित समाजाला शिक्षणाची प्रेरणा दिली, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शिष्योत्तमा फातिमा शेख यांच्या कार्यास अभिवादन करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शिक्षणासारखा महत्वपूर्ण विषय हा संस्थेच्या मुख्य ऊद्दिष्टामध्ये समाविष्ट आहे. संस्थेने सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कार २०२३ देण्यासाठी कार्यक्षेत्रातील भटकेविमुक्त समाजातील व अल्पसंख्याक समाजातील कर्तुत्ववान व प्रतिभावान महिला शिक्षिका अशा दोघींची निवड करून त्यांना महात्मा फुले यांचा ग्रंथ,शाल,एक रोप,पदक व मानपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्काराची घोषणा संस्थेच्या मुख्य संचालिका शोभाताई लोंढे, संस्थापक आप्पासाहेब माने,संघटक चांदभाई शेख व संचालिका यास्मिन पिरजादे,रिटा माने,मायाताई पाटील, मंदाताई सोनताटे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here