सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.31ऑक्टोंबर)
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे वर्षावास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची वाचन करून सर्वांना भोजनदान देऊन समारोप करण्यात आला.
“वर्षावास” म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे होय.
या काळात भिक्खू मध्ये विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान-साधना करणे, बौद्ध उपासक /उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे.
भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची तीन वाचन करणे आणि धम्म बांधवांना त्याचा अर्थ उदाहरणासह समजावून सांगणे..
व उर्वरित महिन्यांन मध्ये धम्म-प्रचार-प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते.
इत्यादी कार्य भंते यांना करावे लागते.
यावेळी भंते कीर्ती बोधी यांना रमामाता महिला मंडळाकडून चीवर दान देण्यात आले.
आणि भोजनदान कार्यक्रमाला अनेक समाज बांधवांनी आर्थिक व धन्य स्वरूपात धम्मदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
या वेळी सिद्धार्थ दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते), नितीन आठवले, हिराबाई दिवेकर, उषाताई इंगोले, जानकाबाई इंगोले, यशोधरा धबाले, यशोदाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, भारतीताई केंद्रेकर, स्वाती दिवेकर, मीराबाई दिवेकर, रंजनाबाई आठवले, लताबाई श्रवले, ममता श्रवले इत्यादी अनेक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वर्षावास निमित्त भोजनदानाच्या कार्यक्रमाला हजारो धम्म बांधवांनी घेतला भोजनाचा स्वाद…!
