Home यवतमाळ उमरखेड येथे दे धडक बे धडक आदिवासी समाजाचा लक्षवेधी मोर्चा

उमरखेड येथे दे धडक बे धडक आदिवासी समाजाचा लक्षवेधी मोर्चा

54

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)
मो.9823995466

उमरखेड (दि. 31ऑक्टोंबर)
दे धडक बे धडक आदिवासी मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती ते बिरसा मुंडा चौक माहेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाईक चौक उपविभागीय कार्यालय उमरखेड या मदनामध्ये हजारोच्या संख्येने आलेल्या आदिवासी बांधवांच्या प्रमुख मागण्या 1)आदिवासी समाजाचे डॉक्टर श्याम वाकोडे यांनाही न वागणूक देणारे खासदार हेमंत पाटील गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल त्यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा.
2) धनगर समाजास अनुसूचित जाती जमाती यामध्ये घेऊ नये, घुसखोरी थांबवणे
3) 12500 विशेष आदिवासी पद भरती झाली पाहिजे
4) घुसखोरी करणाऱ्या बोगस आदिवासी यांच्यावर थेट कार्यवाही झाली पाहिजे
5) भोगवट दर वर्ग दोन जमीन वाटपापासून वर्ग एक मध्ये रूपांतर करणे पेनगंगा अभयारण्य मधील वही वाटातील असलेले कच्चे रस्ते पक्के करून देण्यात यावे इत्यादी या मागणीसाठी आदिवासी बांधवांचा असा भव्य आणि दिव्य मोर्चा उमरखेड शहरामध्ये पार पडला.

या कार्यक्रमास बहुतांश आदिवासी समाजाने व महिला मंडळाने लाखोच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला तालुका बाहेरच्या लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here