Home चंद्रपूर रोशनकुमार पिलेवान यांची राष्ट्रीय संत नामदेव कथा साहित्य पुरस्कारासाठी निवड

रोशनकुमार पिलेवान यांची राष्ट्रीय संत नामदेव कथा साहित्य पुरस्कारासाठी निवड

178

 

रोशन मदनकर (उपसंपादक) मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- पिंपळगाव भोसले येथील रोशनकुमार शामजी पिलेवान यांच्या ” डबलगेम ” या कथासंग्रहाला समृद्धी प्रकाशन हिंगोली व्दारा आयोजित राष्ट्रीय संत नामदेव साहित्य पुरस्कार 2023 जाहीर झाल्याचे पत्र संत नामदेव साहित्य पुरस्काराचे आयोजक प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे मराठी विभागप्रमुख शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांनी दिले आहे. राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संत नामदेव साहित्य पुरस्काराचे वितरण 23 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रोशनकुमार शामजी पिलेवान यांच्या कथा साहित्य प्रकारातील ” डबलगेम “या साहित्य कृतीला संत नामदेव साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आला.
त्यांना या पूर्वी जुन्नर येथील शिवांजली साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील नामांकित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here