बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी
पुसद- विश्वभूषण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पुसदद्वारा 67 वा धम्मचक्र अनुवर्तन दिन मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी समितीचे कार्याध्यक्ष नथुजी वाहुळे ,उपाध्यक्ष नारायण ठोके ,शरद कांबळे सैनिक यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व तथागत बुद्ध, धम्मसेनानी सम्राट अशोक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. ध्वजा रोहनानंतर समता सैनिक दल पुसद भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे यांच्या नेतृत्वात मानवंदना देण्यात आली. तदनंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
यावेळी तथागत बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, भिक्खू संघ व धम्म ध्वजाचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष पी.आर. खंदारे यांनी केले.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड, विष्णू सरकटे, संजय वाढवे, प्रा. महेश हंबर्डे,प्रा. छाया हंबर्डे किशोर मुजमुले, शरद भगत, जांभुळकर सर, प्रकाश कांबळे, भोलानाथ कांबळे,विश्वास भवरे, मेजर साबळे, भगवान बरडे,भारत कांबळे, भगवान कांबळे, विजय बहादुरे, डी.आर. खंदारे, अशोक भालेराव, शरद ढेंबरे, मिलिंद जाधव, चौरे सर, समता सैनिक दल पुरूष व महिला विंग व बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.




