Home पुणे जकार्ता येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या कार्यालयाची स्थापना –...

जकार्ता येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या कार्यालयाची स्थापना – ललित गांधी पुण्यात 20 ते 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत ॲग्रीकल्चर ग्राउंड येथे आयोजन

57

 

पुणे : सध्याच्या काळात कुटुंबाची व्याख्या बदलत चालली आहे. ही वस्तुस्थिती पाहून व्यापारी बंधूंनी अपडेट आणि हायटेक होण्याची गरज आहे. उद्योग व्यवसाय याच्या वाढीसाठी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर तर्फे आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्सपो च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी होते. रेंजहिल्स परिसरातील सिंचननगर मैदानावर येत्या २९ ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन असणार असून दुपारी बारा ते नऊ सर्वांसाठी खुले असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, स्पर्धात्मक युगात डिजिटल प्लॅटफॉर्म आला आहे ग्राहकही हुशार आणि चोखंदळ झाला आहे ग्राहकांच्या गरजा बदलत चालल्या असून उत्पादनाच्या किमती, दर्जा व त्यांचे आयुष्य पाहून वस्तू खरेदी केल्या जातात त्यामुळे उद्योजकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे असा सल्ला त्यांनी उद्योजकांना दिला.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, व्यापाऱ्यांपुढे कॉमर्सचे मोठे आव्हान आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे रिटेल व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एखाद्या गोष्टीचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना लुटण्याचे काम सुरू आहे. माय टेक्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. मायटेक्सला अनेक देशाचे कौन्सिलेट भेट देणार आहेत. परदेशी कंपन्यांना सरकार मोठ्या सवलती देत आहे त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर देशातल्या व्यापाऱ्यांना संधी देण्याची गरज आहे तसेच महाराष्ट्र चेंबरचे जकार्ता येथे कार्यालय स्थापन झाले असल्याचे ही त्यांनी सांगितले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी पाटील यांनी महाराष्ट्र चेंबर आणि कृषी विद्यापीठा तर्फे विविध विषयांवर संयुक्त उपक्रम राबविले जातील व इंक्युबॅशन सेंटर ही लवकरच सुरू करता येईल त्यासाठीही संयुक्त करार केला जाणार असल्याचे सांगितले. महाप्रीतचे दीपक कोकाटे यांनी रूफ टॉप सोलरची माहिती सांगितली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो चे स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरचे असोसिएट डीन डॉ. सुनील माशाळकर एसबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक निरंजन कान्हेकर यांचा सत्कार झाला. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भारत सरकारच्या ज्युट बोर्डाचे मार्केटिंग हेड अय्यपान, एक्सपो इंडियाचे जावेद भाई, भारत सरकारच्या टेक्स्टाईल विभागाचे वरिष्ठ संचालक शिक्षण चंद्रशेखर आदींचा सत्कार झाला. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, तनसुख झांबड, आनंद मित्तल, गोविंद पानसरे, डॉ. विजयकुमार मालपुरे, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी प्रास्ताविक केले चित्रा खरे यांनी सूत्रसंचालन केले मायटेक्सचे पुणे विभागाचे संयोजक दिलीप गुप्ता यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here