Home चंद्रपूर बौध्द धम्माचा सांस्कृतिक वारसा जपणे, ही काळाची गरज-आशिक रामटेके

बौध्द धम्माचा सांस्कृतिक वारसा जपणे, ही काळाची गरज-आशिक रामटेके

77

 

चिमूर- जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे “अशोक विजयादशमी दिनाच्या” कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना बौद्ध पंच कमेटी, मालेवाडा चे सचिव आयु. आशिक रामटेके म्हणाले की, सद्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती, धर्मांधतेला आलेला उत, तरुणाईची व्यसनाधीनता व नैराश्याकडे होत असलेली वाटचाल अशी एकंदरीत परिस्थिती बघता यातून जीवनाचा यशस्वी मार्ग शोधण्याकरिता तथागताच्या धम्म शिकवणीला पर्याय नाही.
बौद्ध धम्मातील महत्वपूर्ण प्रसंग व उत्सव हा धम्माचा सांस्कृतिक वारसा असून तो जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य व काळाची गरज आहे. याप्रसंगी तथागत बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांचे हस्ते अभिवादन करुन सामूहिक त्रिशरण- पंचशील घेण्यात आले. अशोक विजया दशमी बौद्ध धम्मीयांचा पुजनीय व पवित्र सण शुभ व मंगल दिन, मानवांच्या दुःखमुक्तीचा दिवस, धम्मविजयाचा आदर्श दिवस, बौद्ध साहित्यामध्ये सर्वात मोठे महत्त्व असलेला दिवस, एक आदरणीय व अनुकरणीय दिवस, समता, स्वातंत्र्यता, बंधुता व मैत्रीच्या संगमाचा दिवस, असत्यावर सत्याचा विजय दिवस, क्रूरतेवर व पशुतेवर सत्धम्माचा विजय दिवस. या मंगल प्रसंगी आयु. गंगाधर गजभिये, ईश्वर ठवरे, मारोती बहादुरे, भाऊराव गजभिये, दादाजी रामटेके, प्रदीप मेश्राम, विलास मेश्राम, राजेंद्र गजभिये, योगेश मेश्राम,निलेश मेश्राम,प्रशिक बहादुरे ,आयु. भिमाबाई गजभिये, काजल ठवरे, वंदना मेश्राम, रत्नमाला भिमटे, संघमित्रा मेश्राम, सुनंदा रामटेके, विद्या रामटेके, शोभा चव्हाण, शोभा गजभिये, सत्यफुला चव्हाण, शांताबाई रामटेके, भावना शेंडे, आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here