




महागाव ता प्र किशोर राऊत
महागाव- शासनाने सहकार विभाग कार्यन्वयित करुन सहकारातून जनतेचा विकास होईल या उद्देशाने सहकार क्षेत्राची निर्मिति केली अशाच प्रकारे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळेल त्याच प्रमाणे व्यापारी वर्गावर सुद्धा अंकुश राहील असे वाटत होते त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचि निर्मिती करून त्यावर सचिवासह संचालक मंडळ अशा प्रकारची रचना करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीमधे सोयाबीनसह इतर ध्यान्य व कापूस खरेदी केली जात आसल्याने शेतकरी वर्ग आपला शेतातील माल कृषी उत्पन्न बाजार समितीमधे विकण्यासाठी आनित आसुन परंतु बाजार समितीवर असणारे संचालक हे व्यापारीच असल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडुन शेतकऱ्यांचा माल खरेदी करित आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे हित न जोपसता व्यापारी वर्गानाच महत्व देत असल्यामुळे बाजार समितीचे व्यापारीकरण झाले आहे गेल्या दोन दशकापासुन तर कृषी उत्पन्न बाजार समितीची आवस्था मृतप्राय झाल्यागत वाटत आहे
नाही सहकार! नाही उद्धार! एकमेकांना साहाय्य करु अवघे धरू सुपंथ हे ब्रिदवाक्य आता कालबाह्य झाले आहे सभापतीसह संचालकानी व सचिव यांनी पदाचा दुरुपयोग करुनमोठ्या प्रमाणात अपहार केला असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिति डबघाईस आणली आहे .व्यापारी वर्गाच्या सेसफंडापासुन ते कृषी उत्पन्न बाजार समितिला येत असलेल्या उत्पन्नापर्यंत सर्व निधीचा स्वाहाकार केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अखेरच्या घटका मोजत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्यांच्या तिळमात्र हिताची नसल्याने बाजार समिती शेतकऱ्यांसाठी वरदान न ठरता शाप ठरली आहे. अशा बिकट परिस्थितीतुन वाटचाल सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवासह संचालक मंडळाने देणगी घेऊन कर्मचारी भरती घेतली आधीच दुष्काळ त्यामध्ये तेरावा मास आणल्यामुळे आता कर्मचारी यांचे वेतनाचा प्रश्न उभा राहीला आहे वास्तविक पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीला नोकराची आवश्यकता नसताना सचिवाच्या भ्रष्टाचार वृतीतुन कृषि उत्पन्न बाजार समितीवर भुर्दंड लादला असल्यामुळे बाजार समितीला अखेरची घरघर लागली असुन शेवटच्या घटका मोजत आहे त्यामुळे सचिवासह माजी संचालक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समिती वाट लावली आहे एवढेच नव्हें तर सचिवानी एवढ्यामोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्यानं सचिवाकडून या अपराची वसुली करुन कारवाही करण्याची मागणी शेतकरीवर्ग करीत आहे

