बळवंत मनवर/पुसद
दि.20 सप्टेबर पासून यवतमाळ स्थित आझाद मैदानात सूरू असलेल्या आमरण ऊपोषणाला तब्बल 18 वा दिवस सूरू आसुन या ऊपोषण कर्ते धनंजय वानखडे ह्यांची प्रकृती अतिशय खालावल्याने आमरण ऊपोषण त्यांनी तूर्त सोडावे अशी विनंती आम्ही केली होती ,पंरतु आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देवून आज आमच्या हस्ते ज्यूस घेवून त्यानी ऊपोषण सोडले ,मात्र मागण्या पूर्ण होईपर्यत रस्त्यावरची लढाई मी लढत राहणार असा निर्धार व्यक्त केला आहे.आमरण ऊपोषण मंडपातील दूसरे ऊपोषणकर्ते दिपक भाऊ कोम्पेलवार ह्यांनी आमरण ऊपोषण सूरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवत. महाराष्ट्राचे लाडके आदरणीय मूख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनीआपल्या यवतमाळ जिल्हा दौ-यात ऊपोषण मंडपाला भेट द्यावी व लेखी आश्वासन द्यावे तरच मी ऊपोषण सोडेल असा एल्गार व्यक्त केला.
ह्या प्रसंगी वंचीत बहूजन आघाडीचे नेते कार्याध्यक्ष रणधीरभाऊ खोब्रागडे,
महासचीव ॲड.श्याम खंडारे ,संघपालजी कांबळे घाटंजी तालूकाध्यक्ष ह्यांनी ऊपोषण मंडपातील ऊपोषणकर्त्याच्या मागण्याची आस्थेने विचारपूस केली असता त्यांच्या मागण्या विद्यार्थ्याच्या व बेरोजगार यूवकाच्या हिताच्या व रास्त असल्याने शासनाने त्यांच्या मागण्याची व आमरण ऊपोषणाची तात्काळ दखल घेतली पाहीजे,अशी वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने शासनाला मागणी केली आहे त्याच्या रास्त मागण्यांना आमचा पाठींबा आहे,त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली ह्या प्रसंगी ऊपोषण मंडपात प्रशांत मूनेश्वर जिल्हाध्यक्ष यूवा एल्गार विद्यार्थी संघटना,बिपीन चौधरी जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती,प्रा.श्रीकांत माडे सर,सावन बनसोडे,सूरज बारसे,अंकूश अघम,किशोर पोपटकर ई.ऊपस्थित होते .
