नागभीड :संजय बागडे 9689865954
नागभीड येथील प्रसिद्ध साहित्यिक व राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय येरणे यांच्या “ओढ” चारोळी काव्यसंग्रहाचे प्रकाशन रामायण, नागभीड येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन जयस्वाल सर, माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे, कवी सागर शंभरकर सर, पर्यटनप्रेमी समीर भोयर सर, लेखक व पत्रकार पराग भानारकर, युवा नेते इंजी. तबरेज शेख, बाल गणेश मंडळ भगतसिंग चौक नागभीडचे सदस्य अविनाश मदनकर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडले.
संजय येरणे हे वैचारीक लेखक असून त्यांचे ३० वे पुस्तक प्रकाशित झाले, यापूर्वी संत साहित्यावरील योद्धा, यमुना रमास्त्र हया कादंबरी, डफरं, डमरू हे कथासंग्रह, बालसाहित्य, कविता, समीक्षा आदी सर्व साहित्य प्रकारात त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन प्रसिध्द आहे, नुकताच राज्य शासनाचा२०२३ चा शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. साहित्य निर्मितीतील सातत्य या बाबत मित्रमंडळी द्वारा अभिनंदन करण्यात येत आहे.
