बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जातेगाव येथे तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वा शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी ते म्हणाले की एक गाव एक गणपती संकल्पना राबवून सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करावे एकोपा रहावा शांतता भंग करु नये असे ही आवाहन वाघमोडे साहेब यांनी केले आहे
सविस्तर आसे की गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जातेगाव येथे गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक दि 17/9/2023 रोजी सकाळी 9 वा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक संपन्न झाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे साहेब यांनी गावातील युवक नागरिक गणेश मंडळ सर्व गावकऱ्यां सोबत संवाद चर्चा केली बोलताना शंकर वाघमोडे म्हणाले की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव इंग्रजाला पळुन लावण्यासाठी सुरू केला आहे,त्या पद्धतीने काही तरी उपयोग समाजाला होईल असे उपक्रम राबवा, व्हाट्सअप फेसबुक वर आलेल्या पोस्ट चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नये व धार्मिक व भावना दुखवतील अशा पोस्ट करू नये, गणेश उत्सवामध्ये डि जे मुक्त व गुलाल मुक्त,फुले उदळा,टाळमृदग गजरात मिरवणूक काढा, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपक्रम, गावातील विधवा माता यांना साड्या चोळया वाटप करणे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे सर्व जाती धर्मातील नागरिकांनी शांतता राखून गणेश उत्सव सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवुन साजरा केल्यास व शैक्षणिक उपक्रम,राबवावे, तलवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देऊन गणेश मंडळाचा सन्मान करण्यात येईल यावेळी जमादार काकडे, , खंडागळे, चव्हाण पोलीस कर्मचारी तसेच सरपंच बंडु नाना पवार, बाबुराव चव्हाण, शंकर पवार, रमेश बप्पा चव्हाण, नारायण कारके, कृष्णा पवार, कल्याण चव्हाण, दत्ता भाऊ वाघमारे, विशाल पांढरे, गोपाल भैय्या चव्हाण, अंकुश दादा धोडरे,गोरख चव्हाण,अवि चव्हाण, हरिभाऊ चांभारे,लाहुल सोनवने,पिटू बापू चव्हाण, दत्ता लोणे, नारायण चव्हाण, ज्ञानेश्वर भिकारी,ओम चव्हाण, रामेश्वर चव्हाण, नामदेव चव्हाण, गणेश भिकारी, आदी सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते




