अहमदनगर – शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन, नियोजन व कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली लेखक,कवी, साहित्यिक, मार्गदर्शक , सल्लागार व सभासद यांची समन्वय सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंधच्या या साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांबरोबरच नवोदितांनाही मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यात येणार असून संमेलनाचे उद्घाटन, साहित्य लोकजागर यात्रा, पुस्तक प्रकाशन व पुस्तक प्रदर्शन, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद,चर्चासत्र, कथाकथन, वाड: मय पुरस्कार, स्पर्धांचे बक्षिस वितरण, समारोप व पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन,समित्यांमध्ये सहभागी करुन जबाबदारी निश्चित करणे, निधी संकलन,कार्यक्रम पत्रिका निश्चित करणे, संयोजन समिती, स्वागत समिती स्थापन करणे व येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे यासाठी मंगळवारी १९ तारखेला दु.११ ते १ या वेळेत कोहिनूर मंगल कार्यालय, अहमदनगर येथे संमेलन नियोजन व समन्वय बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जे कवी व साहित्यिक ,सदस्य सहभागी होणार आहेत त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नाव नोंदणी केल्यामुळे काम करणे सोपे जाईल.
तरी या बैठकीस साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,कार्याध्यक्ष प्रा. डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे, भारत गाडेकर, राजेंद्र फंड, किशोर डोंगरे, राजेंद्र पवार, डॉ. तुकाराम गोंदकर, सुनील धस, अजयकुमार पवार, बबनराव गिरी,डॉ.गुंफा कोकाटे,स्वाती ठुबे व शर्मिला गोसावी यांनी केले आहे.
