Home यवतमाळ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी पीडित महिलेला केली पाच हजाराची मदत

सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी पीडित महिलेला केली पाच हजाराची मदत

72

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

महागाव (दि.15 सप्टेंबर) दुःखाबद्दल चांगले जाणुन घेतल्यावरच सुख मिळते प्रत्येक माणुस कधी ना कधी दुःखी असतो दुःखाचे कारण काय आहे.
दुःख संपवण्याचे मार्ग कोणते आहेत त्याची ज्याला जाणीव आहे. तोच खरा सुखी आहे.
असे भगवान गौतम बुद्ध म्हणतात.

महागाव तालुक्यातील हिवरा येथील बौद्ध समाजातील अनुसयाबाई जाधव या माईंच्या दोन्ही हाताची बोटे अगदी निकामी व खराब झालेले अवस्थेत होती.

उमरखेड महागाव विधानसभे
मध्ये चर्चेत असलेले जनसामान्यचे नेतृत्व म्हणजे माननीय साहेबराव कांबळे बेलखेडकर (सामाजिक कार्यकर्ते) यांना सामाजिक कार्यकर्त्या सुधाकर कांबळे यांनी कॉल करून पीडीत माई ची व्यथा सांगितली. महिलेवर दुःखाचा घाव घेतला.

सुधाकर कांबळे यांनी काही कार्यकर्ते सोबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संबंधित माहिती देत फिरत असतांना मला आपल्या समाजातील अंकुश जाधव या कार्यकर्ता मला अत्यंत गरीब असलेल्या या माईची माहिती दिली.

मी लगेच सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे साहेब फोन केला. त्यांनी लगेच माझ्या एका शब्दावर या माईस 5000/ पाच हजार रुपयेची आर्थिक सहाय्य केले. अशी माहिती सुधाकर कांबळे यांनी दिली.

यामुळे पिढीच महिलांनी साहेबराव कांबळे यांच्या धन्यवाद व आभार मानले आहे.

यावेळी सुधाकर कांबळे, रमेश सांगडे महागाव अभिजित पाईकराव व हीवरा येथिल बौद्ध बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here