प्रतिनिधी-बाळासाहेब ढोले
पुसद- अग्निपंख शैक्षणिक समूह , महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यभरातून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विविध उपक्रम राबविणाऱ्या नवोक्रमशील शिक्षकांना सदर पुरस्कार देण्यात येते. सन २०२२-२०२३ साठी हा पुरस्कार महाराष्ट्रातील एकूण २२ शिक्षकांना जाहीर करण्यात आला.
त्यात पुसद येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक तथा उपक्रमशील शिक्षक शिवशंकर मारोतराव घरडे यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल युवक मंडळ पुसद चे सचिव, आमचे मार्गदर्शक मा.विजयभाऊ जाधव, युवक मंडळ द्वारा संचालित, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मित्रमंडळी व शुभचिंतकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
यापूर्वी देखील त्यांना, महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विविध संस्थेतर्फे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षण रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार, शिक्षक गौरव पुरस्कार, अशा पुरस्काराचा समावेश आहे.
