Home चंद्रपूर जिल्हा क्रीडा स्पर्धेत ने. हि. कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

जिल्हा क्रीडा स्पर्धेत ने. हि. कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

98

 

रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

ब्रम्हपुरी(दि. 10 सप्टेंबर):-
चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेत ने हि कन्या विद्यालय ब्रम्हपुरीच्या हँडबॉल संघाने 14 वर्षीय गटात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चंद्रपूर या संघाचा 8-1 पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 17 वर्षीय गटात श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूर या संघाचा 13-1 ने पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेमध्ये दोन्ही संघाने विभागीय स्तरावर चंद्रपूर जिल्हयाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला.
ने. हि. कन्या विद्यालयने आजपर्यंत अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पाठवून गौरव प्राप्त केला आहे. ने. हि. संस्थेचे श्री. अशोकजी भैय्या, मुख्याध्यापिका सौ. बनपुरकर, उपमुख्याध्यापक श्री. भैय्या सर, पर्यवेक्षक श्री. निखारे सर यांच्या प्रो्साहनामुळे तसेच क्रीडा प्रशिक्षक कु. एन. पी. भारती मॅडम, श्री. बारेकर सर तसेच प्रशिक्षक सूरज मेश्राम, शुभम जग्गले यांच्या विशेष सहकार्यामुळेच हे धवल यश प्राप्त करता आले. यापुढील वाटचाली करीता सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here