Home महाराष्ट्र हिंगोणे खुर्द येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक...

हिंगोणे खुर्द येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक विचारांवर चालणे ही काळाची गरज – डॉ.सुरेश झाल्टे. २४ सप्टेंबरला नाशिक येथे सत्यशोधक समाज संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी.डी.पाटील.

77

 

धरणगांव प्रतिनिधी

धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावात सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोणे खुर्द गावाचे सरपंच अरुण शिरसाठ होते. प्रमुख मार्गदर्शक सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी.डी. पाटील, एच.डी.माळी, तुषार पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
डॉ. सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास उलगडला. सत्यशोधक समाज संघाचे महत्त्व सांगून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करून प्रत्येकाने सत्यशोधक विधीप्रमाणे विधी करावेत असे आवाहन केले.पी.डी. पाटील यांनी येत्या २४ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण शिरसाठ यांनी आम्ही गाडी करून नाशिक येथे अधिवेशनाला नक्की येऊ असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक तथा सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक एच.डी. माळी यांनी तर आभार अरुण शिरसाट यांनी मानले. बैठक यशस्वीतेसाठी हिंगोणे खुर्द गावातील सर्व तरुण मित्रांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here