Home चंद्रपूर शाळा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा तथा निरोप समारंभ

शाळा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा तथा निरोप समारंभ

29

 

सावली तालुक्यातील मौजा जांब (बुज) येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा येथे ८ सप्टेंबर २०२३ रोजी, VSTF निधी अंतर्गत करिअर मार्गदर्शन व शाळा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा तथा निरोप समारंभ सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मा. मधुकर वासणीक साहेब गट विकास अधिकारी पं.स. सावली,
अध्यक्ष मनोज मेश्राम अध्यक्ष शा.व्य.स. जांब (बुज)
प्रमुख मार्गदर्शक सन्मा. आशिष बोरकर साहेब पोलिस निरीक्षक सावली, डॉ. प्रा. रमाकांत गजभिये साहेब, स्वप्निल मडावी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गडचिरोली
विषेश अतिथी सन्मा. लोकेश खंडारे साहेब गट शिक्षणाधिकारी पं.स.सावली, अमोल आकरे साहेब केंद्र प्रमुख केरोडा, जयेंद्र राऊत शि.वि.अ. व्याहाड खुर्द, वर्षा गेडाम संरपच, शामत गायकवाड उपसरपंच जांब (बुज), उमाकांत चरडुके पो.पाटील जांब बुज, उपस्थित होते.
ऑनलाइन अभ्यास हा मर्यादित असतो. आणि प्रत्येकांला ऑनलाइन अभ्यास करणे जमत नसते. त्यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी. आणि विद्यार्थ्यांने अभ्यास करून आपले कौशल्य गुण दाखवावे. आई वडिल आणि शिक्षकांचे नाव मोठे करावे हा उदात्त हेतू समोर ठेवून जि.प. उच्च प्राथमिक शाळा जांब (बुज) शाळे तर्फे शाळेतील एक वर्ग खोलीत बाल वाचनालय सुरू करण्यात आले. याप्रसंगी सन्मा. आशिष बोरकर साहेब पोलिस निरीक्षक सावली यांनी ह्या बाल वाचनालयाला ५ हजार रुपयाचे पुस्तक भेट म्हणून दिली. सन्मा. आशिष बोरकर साहेब स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस निरीक्षक झाले आहेत. त्यामुळे ते स्पर्धेबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन देत असतात आणि अनेक वाचनायला स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट म्हणून देत असतात. बोरकर साहेबांचे कार्य वाखान्याजोगे आहे. गट विकास अधिकारी श्री. मधुकर वासणीक साहेब यांनी खुप मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि अभ्यास कशाप्रकारे करायचा, अभ्यासाला वेळ किती द्यायचा हे त्यांनी योग्यरीत्या पटवून सांगितलं.
त्यांनंतर जि.प. उच्च प्राथमिक शाळा जांब (बुज) शाळेत कार्यरत असताना श्री. सुरेश जिल्हेवार सरांच्या कल्पनेतून आणि गावातील लोकांच्या मदती मधून… ५ लाख रुपये खर्च करून जि.प. उच्च प्राथमिक शाळा जांब (बुज) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराची वास्तू बांधण्यात आली. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही जि.प. शाळेला नाही.

 

असे प्रवेशद्वार….

 

जि.प. प्राथमिक शाळा जांब (बुज)चे मुख्य प्रवेशद्वार लोकवर्गणीतून उभारण्यात आले. या वास्तूचे उद्घाटन श्री. सुरेश जिल्हेवार सर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांनतर जि.प. प्राथमिक शाळेच्या वतीने आणि गावातील नागरिकांच्या वतीने सत्कारमूर्ती कु. वंदना काशिनाथ गाजर्लावार शिक्षिका, श्री. सुरेश आयलूजी जिल्हेवार शिक्षक यांचा समारोपीय समारंभ पार पडला. याप्रसंगी जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवेंद्र रायपुरे सर, निकेश आत्राम सर, संदीप कोहळे सर, आणि उमाकांत चरडुके पो. पाटील, ज्ञानदेव हुलके, भास्कर धानफोले, संजय पाल, कैलास हुलके, पत्रकार/कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे आणि गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here