निकेश गाडगे व राजु गायकवाड यांचा आंदोलनाचा इशारा
सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 8 सप्टेंबर):-मागील 2 वर्षापासून सतत निवेदन देऊनही अद्याप उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळआसोली पर्यंत रस्त्याची दुरावस्था जशास तशीच आहे.
या रस्त्यावर कित्येक अपघात झाले आहे. काही डिलिव्हरी पेशंट पण खराब झालेल्या रस्त्यामुळे पुसद सारख्या ठिकाणी रुग्णालयात जात आहेत आणि बांधकाम विभागाला या रस्त्याची काम झालं पाहिजे याची जाणीव संघटनेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने नेहमीच करून दिली जाते.
परंतु त्यांनी कधीच या विषयाला गंभीरतेने घेतले नाही असे जाणवते या रस्त्याने कित्येक ईग्लिश स्कूल चे मुल बस ने जातात त्याचा कधी अपघात झाला तर याला कोण जबाबदार असणार बांधकाम विभाग प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार कामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्याकडून काम करण्याकरिता कोणतीही सूचना देण्यात आली नाही.
या रस्त्यावर वाशिम ते उमरखेड मोठ्या प्रमाणात रहदारी आहे.
हा रस्ता पूर्णपणे निकामी झाल्याने या रस्त्यावर मोठमोठे गड्डे पडले आहे.त्यामुळे दररोज अपघात होत आहे.
या होणाऱ्या अपघाताची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील.
असा इशारा निवेदन देण्यात आला आहे. यावेळी निकेश गाडगे, राजू गायकवाड, सम्राट ढोबळे, रोहन धुळे,तेजस झोगडे, बालाजी गायकवाड, आदित्य डोंगरे, आशिष डोंगरे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.