Home महाराष्ट्र वरूड येथील शिक्षक परिषदेत शेकडो सेवानिवृत्त शिक्षक सन्मानित !

वरूड येथील शिक्षक परिषदेत शेकडो सेवानिवृत्त शिक्षक सन्मानित !

53

🔹शिक्षण परिषद व सन्मान सोहळ्याला हजारो शिक्षकांची उपस्थिती !

🔸आमदार देवेंद्र भुयार यांचे सेवानिवृत्त शिक्षकांनी मानले आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.8सप्टेंबर):-वरूड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून नविन शैक्षणिक विचार व नविन तंत्रज्ञान यांची माहिती शिक्षकांना व्हावी व ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घातले त्यांचा गुणगौरव व्हावा या उद्देशाने शिक्षक परीषद तथा सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या तर्फे करण्यात आले होते.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार शिक्षकांना संबोधित करतांना म्हणाले की, शिक्षकांना समाजामध्ये मान सन्मान असल्याने शिक्षक हा सेवानिवृत्त झाला तरी तो ज्ञानाचा झरा असतो, शिक्षक हा ज्ञानाचे विद्यापीठ असते. म्हणूनच सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षक हा कायमस्वरूपी विद्यार्थी असून तो सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील तो समाज सेवक असतो असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.

यावेळी शेकडो सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते सेवापूर्ती च्या निमित्ताने शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रणजितसिंह डीसले गुरुजी म्हणाले की शिक्षकांनी जीवनभर सकारात्मक कार्य करावे, वाचन, चिंतन, मनन करून समाजाचे लोक प्रबोधन करावे असे जाहीर आवाहन केले.

या सत्कार सोहळ्याला रणजितसिंह डीसले गुरुजी, कार्यक्रमाध्यक्ष आमदार देवेंद्र भुयार, प्रमुख अतिथी बाळू पाटील कोहळे, राजाभाऊ कुकडे, वरुड गटविकास अधिकारी वीरेंद्र कनाटे, मोर्शी गटविकास अधिकारी उजवला ढोले, वरुड मुख्याधिकारी प्रवीण मानकर, वरुड गटशिक्षणाधिकारी दशरथ गाडगे , मोर्शी गटशिक्षणाधिकारी डॉ नितीन उंडे, नीलकंठ यावले , पुरुषोत्तम कळमकर, राजू बहुरूपी, यांच्यासह विविध शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा चंदू पाखरे ,दिलीप बुरगे ,प्रास्ताविक डॉ नितीन उंडे ,परिचय मुख्याध्यापक नितीन ठाकरे, आभार दशरथ गाडगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here