Home चंद्रपूर सेवानिवृत्त शिक्षक करणार आंदोलन-पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा सक्रिय सहभाग

सेवानिवृत्त शिक्षक करणार आंदोलन-पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा सक्रिय सहभाग

110

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यातील जिल्हा परिषद मध्ये तीस पस्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या बऱ्याच शिक्षकांची वीस पंचवीस लाख रुपये शासनाकडे प्रलंबित आहे. निवृत्त शिक्षकांनी जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी, लेखी पत्र देऊन विनंती करून बघितले परंतु जिल्हा प्रशासनाने सदर शिक्षकांना काहीही दिले नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचा काळ कसा घालवावा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे. प्राथमिक शिक्षकांनी आपल्या सेवा काळात गृह बांधणीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी शिक्षक पतसंस्थेकडून, बँकेकडून लोन घेतले.

सदर लोन सेवा निवृत्तीचे पैसे मिळाल्यानंतर भरता येईल असा विचार करूनच कर्ज घेतले. सेवा निवृत्तीला दोन वर्ष झाले शासनाकडून सदर रक्कम मिळाली नाही, त्यामुळे बँकेचे सोसायटी घेतलेले कर्ज भरताच आलेले नाही. सदर कर्जावर संस्था, बँका व्याजाची आकारणी करत आहे. त्यामुळे कर्ज वाढत आहे. अशा अडचणीत शिक्षक वर्ग सापडला आहे. किती दिवस वाट बघावी म्हणून शेवटी सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी चंद्रपूर येथे एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे .

सदर आंदोलन शिक्षक दिनीच करावे असे ठरले आहे.सदर आंदोलनात पुरोगामी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गीलोरकर सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here