Home महाराष्ट्र आमदार देवेंद्र भुयार यांना बांधल्या चक्क ५ हजार बहिणींनी राख्या !

आमदार देवेंद्र भुयार यांना बांधल्या चक्क ५ हजार बहिणींनी राख्या !

128

🔸हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील — आमदार देवेंद्र भुयार

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.1सप्टेंबर):-नुकताच देशभरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊ बहिणीमधील हळुवार प्रेमळ नात्याचा हा सण जितका आनंददायी तितकाच भावनिक आहे. याची प्रचिती नुकतीच वरूड तालुक्यात आली आहे.

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना वरूड तालुक्यातील ५ हजाराहून अधिक महिला भगिनींनी राखी बांधली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथे आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळा तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्षाबंधन सोहळ्याला उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राखी बांधण्यासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीने वरूड येथील कार्यक्रमात उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात आपली जबाबदारी म्हणुन कर्तव्य पार करित असलेल्या वरूड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस, आशा सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य परिचारिका, सीआरपी सखी, बँक सखी, पशु सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषि सखी, वर्धीनी सखी,शालेय पोषण आहार सेविका यांना विशेष मार्गदर्शक मोनिकाताई उमक संयोजिका स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान मुंबई यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन केले.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार देवेंद्र भुयार यांनी रक्षाबंधनाची सांस्कृतिक परंपरा कायम राखत एक चांगला सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील महिला भगिनींचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे हे उत्तम व्यासपीठ आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिले आहे.

या कार्यक्रमामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांना मतदार संघातील भगिनींनी आ. देवेंद्र भुयार यांच्या दोन्ही हातांना राखी बांधून राखी बांधण्यासाठी आलेल्या हजारो महिला भगिनींसोबत सेल्फी घेत आनंदात आणि उत्साहात त्यांनी हा उत्सव साजरा केला.यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की तुम्हां सर्वांच्या प्रेमाची आणि विश्वासाची कायम जाण ठेवून, उत्साहाने, जबाबदारीने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मला मिळाली. हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील याची खात्री देतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अशी भावना यावेळी आमदार आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

माझ्या बहिणींना भेटण्याचा हा अविस्मरणीय क्षण !
रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या पवित्र आणि हक्काच्या नात्यातील प्रेम, विश्वास, ऋणानुबंध वाढवणारा सण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मतदार संघातील विविध भागातून आलेल्या अनेक भगिनींनी वरूड येथील कार्यक्रमात येऊन मला प्रेमाने आपुलकीने राखी बांधल्या. अतिशय उत्साहात आणि आनंदाने आम्ही रक्षाबंधन सण साजरा केला. खरं तर या दिवसाची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद साजरा करण्याचा हा दिवस. दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या या सर्व भगिनींनी यावर्षीचा रक्षाबंधन सोहळा आणखी अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाही. — आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here