Home महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय युवा दिन युथ फेस्टीव्हल-मिलींद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय युवा दिन युथ फेस्टीव्हल-मिलींद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

87

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 1 सप्टेंबर):- तालुक्यातील मिलींद महाविद्यालय मुळावा येथील विद्यार्थ्यांनी यवतमाळ येथे आयोजित जिल्हा स्तरावरील नाटय स्पर्धेत सहभाग घेतला.

या स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्त्री रुग्णालय यवतमाळ येथे 24 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते या स्पर्धे मध्ये एचआयव्ही प्रसाराचे मार्ग एचआयव्ही संबंधित समज व गैरसमज हेल्पलाईन1097 संबंधित माहिती या विषयांवर आपलयातील कलागुणांच्या आधारावर जनजागृती पर सुंदर पथनाटय सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले या स्पधेकरिता मिलींद महाविद्यालय मुळावा रेड रिबन क्लब संयोजक प्रा. ज्योती खंदारे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.

या स्पर्धेत कुं रागिनी गणेश लोखंडे कु प्रियंका वामन खडसे आकाश रामराव कहाळे प्रज्वल प्रकाशराव देशमुख सचिन मिलींद बरडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता उमरखेड तालुका आयसीटीसी समुपदेशक वैशाली धोंगडे महाविद्यालयाचे प्रभारीप्राचार्य डॉ डि एस पवार, डॉ अनिल काळबांडे, डॉ प्रदिप इंगोले , डॉ जयमाला लाडे, डॉ राहुल धुळ धुळे, डॉ विश्वास दामोधर, प्रा क्रांती मुनेश्वरव व कर्मचारी यांनी विदयाथ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here