सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.31ऑगस्ट):–तहसिल कार्यालयात आपल्या कामकाजासाठी गेलेल्या नागरिकानां कार्यालयात पिण्याचे पाणी उपल्बध नसल्यामुळे नागरिकांना पाणी पिण्यासाठी थेट हाॅटेल मध्ये जाऊन पिण्याची किंवा घरुन सोबत पाण्याची बाॅटली घेऊन यावे लागत आहे. सध्या पाऊस गायब झाल्यामुळे उन्ह मोठ्या प्रमाणात तापत आहे. त्यात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही हो मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
कार्यालयात येणारे नागरिक पिण्याच्या पाण्या करिता त्रस्त होत असुन जिवती तलसिल कार्यालयातील अधीकारी दुर्लक्ष करित असल्याची बाब लक्षात घेऊन भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिवती तालुक्यातील युवा नेते सुबोध भैया चिकटे यांनी जिवती तहसिलचे तहसिलदार यांच्याकडे तहसिल कार्यालयात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली असुन निवेदन सुबोध चिकटे व अमोल कांबळे सर यांच्या हस्ते तहसिलदार यांना देण्यात आले.




